|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » leadingnews » राजपथावर देशाचे शक्तिप्रदर्शन ; शानदार सोहळा

राजपथावर देशाचे शक्तिप्रदर्शन ; शानदार सोहळा 

 ऑनलाईन  टीम  / नवी दिल्ली    :

देशभरात ६९ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असून दिल्लीतील राजपथावर संचलन सुरु आहे. देशाच्या लष्करी सामर्थ्याचे दर्शन जगाला घडत असून आसियान (असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट नेशन्स) या आग्नेय आशियातील १० देशांचे राष्ट्रप्रमुख सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत.

भारताचे लष्करी सामर्थ्य, संस्कृती आणि विविधतेचे दर्शन आज प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील राजपथावर घडले  आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी इंडिया गेटवर अमर ज्योती येथे शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. तिन्ही दलांचे प्रमुख आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या प्रसंगी उपस्थित होते. 

दुचाकीवर चित्तथरारक कसरती सादर केल्या. नौदलातील स्वदेशी बनवटीची ‘विक्रांत’ या विमानवाहू युद्धनौकेची प्रतिकृती, ऑल इंडिया रेडिओ, आयकर विभागाचे चित्ररथही यात सहभागी झाले.यानंतर विविध राज्यांचे चित्ररथ राजपथावर दाखल झाले. यावेळी महाराष्ट्राच्या चित्ररथाने देशाचं लक्ष वेधून घेतलं. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचा सोहळ्याचा चित्ररथ महाराष्ट्राने राजपथावर उतरवला. यावेळी उपस्थित असलेल्या खासदार संभाजीराजे भोसले यांनी उभं राहून जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा दिल्या.

Related posts: