|Thursday, September 19, 2019
You are here: Home » Automobiles » ब्रिझाचे पेट्रोल व्हेरिएंट लवकरच बाजारात ?

ब्रिझाचे पेट्रोल व्हेरिएंट लवकरच बाजारात ? 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मारुतीची एसयूव्ही व्हिटारा ब्रिझाला भारतामध्ये मोठय़ प्रमाणावर मागणी आहे. एसयूव्ही आवडणारे मारुतीच्या या गाडीला पसंती देत आहेत. भारतातल्या यशस्वी एसयूव्हीमध्ये व्हिटारा ब्रिझाचे नाव घेतले जाते. डिसेंबर 2017मध्ये व्हिटारा ब्रिझाच्या 2 लाख मॉडेल्सची विक्री झाली होती. या यशानंतर आता कंपनी लवकरच पेट्रोल व्हेरियंटही बाजारात आणणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

ऑटो एक्सपो 2018मध्ये मारुती व्हिटारा एक्सपोचं पेट्रोल व्हेरियंट लॉन्च करण्यात येईल, अशी माहिती मिळते. ऑटो एक्सपोमध्ये व्हिटारा ब्रिझाचे पेट्रोल व्हेरियंट लॉन्च होईल अशी माहिती काही मीडिया रिपोर्ट्समधून समोर आली आहे. तरी कंपनीने मात्र याबाबत कोणतंही स्पष्टीकरण दिलेले नाही .पेट्रोल इंजिनामध्ये मारुती 1.5 लीटरचे इंजिन देऊ शकते. हे इंजिन कारला 100 बीएचपीची ताकद देईल. या एसयूव्हीला 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गियरबॉक्ससोबत लॉन्च करण्यात येऊ शकते.

व्हिटारा ब्रिझा सध्या 6 रंगांमध्ये उपलब्ध आहे. या गाडीमध्ये टर्न इंडिकेटर, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, स्मार्टप्ले इंफोटनमेंट सिस्टिम, कूल्ड ग्लव बॉक्स, प्रुज कंट्रोल, प्रोजेक्टर हेडलॅम्प इत्यादी फिचर्स देण्यात आले आहेत. भारतीय बाजारामध्ये ब्रिझाचे पेट्रोल मॉडेल डिझेल मॉडेलपेक्षा स्वस्त असेल. डिझेल मॉडेलची किंमत 7.28 लाख रुपयांपासून सुरु होते.