|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रत्नागिरी-नागपूर महामार्ग हातखंबा तिठा येथून नियोजित करावा

रत्नागिरी-नागपूर महामार्ग हातखंबा तिठा येथून नियोजित करावा 

कुवारबाव व्यापारी संघांची एकमुखी मागणी

मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन

प्रतिनिधी /रत्नागिरी

रत्नागिरी-नागपूर महामार्ग रुंदीकरण करताना तो हातखंबा तिठा येथूनच नियोजित करण्यात यावा अशी मागणी आहे. त्यासाठी आतापर्यंत सनदशीर मार्गाने लढा उभारण्यात येत आहे. मागणीची दखल न घेतल्यास यापुढे लढा तीव्र करण्याचा अशारा कुवारबाव व्यापारी संघाच्यावतीने देण्यात आला आहे.

कुवारबाव व्यापारी संघाच्यावतीने प्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. संघाचे अध्यक्ष सुनील साळवी व कार्याध्यक्ष निलेश लाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते. रत्नागिरी ते हातखंबा तिठा दरम्यान रत्नागिरी नागपुर राज्य महामार्ग क्रमांक 166 रस्ता रुंदीकरण मध्यापासून 15-15 मीटर अर्थात संपूर्ण रस्ता 30 मीटरच करण्यात यावा. 30 मीटर रुंदी घेतल्यानंतर उर्वरित जागेत बांधकाम करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.

रत्नागिरी ते हातखंबा दरम्यान होणारा उड्डाणपूल रद्द करण्यात यावा. 30 मीटर रुंदीकरणाबाबत जे बाधित होणारे घटक आहेत. त्यांना पर्यायी व्यवसाय व निवासासाठी जागा मिळावी. प्रकल्पग्रस्त म्हण्tान त्या बाधितांना गणण्यात यावे. या समस्या , अडचणी व मागण्यांचा सहानूभूतीपुर्वक विचार करावा. प्रत्यक्ष चर्चा करून योग्य निर्णय किंवा न्याय न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात अध्यक्ष सुनील साळवी, निलेश लाड, राजेश तोडणकर, प्रभाकर मयेकर, सुधाकर सुर्वे, प्रभाकर खानविलकर आदी सहभागी झालेले होते.

Related posts: