|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » माघीसाठी तीन लाख भाविक

माघीसाठी तीन लाख भाविक 

विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेत 70 हजार भाविक : पदस्पर्श दर्शनासाठी 8 तासांहून अधिक काळ

माघी एकादशींचा सोहळा अवघ्या एका दिवसांवर येवून ठेपला आहे. यासाठी सध्या पंढरीत तीन लाखांहून अधिक भाविक येउन दाखल झाले आहेत. त्यामुळे सारी पंढरी नगरी ही गर्दीने फुलून गेलेली दिसून येत आहे.

माघी यात्रेसाठी मोठय़ा प्रमाणावर भाविक दाखल झाले असल्यामुळे संपूर्ण पंढरी नगरी गजबजून गेली आहे. पंढरीमधे सर्वत्रच भाविकांची गर्दी दिसून येत आहे. माघींच्या पार्श्वभूमीवर सध्या पंढरीत प्रशासनाकडून भाविकांच्या सेवेसाठीची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. यातच विठठलांच्या पदस्पर्श दर्शनरांगेतही मंदिर समितीच्या वतीने स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असल्यांचे दिसून आले आहे.

सध्या विठ्ठलांची पदस्पर्श दर्शन रांग ही साधारणपणे पत्राशेडचया पुढेपर्यत गोपाळपर्यत जावून पोहोचली आहे. त्यामुळे विठठलांच्या दर्शनसाठी साधारणपणे 8 तासांचा कालावधी आज लागत होता. तर मुखदर्शनासाठी दोन तासांपेक्षा अधिक वेळ लागत होता. सध्या पदस्पर्श दर्शन रांग ही दूरपर्यंत जावून पोहोचल्याने साधारणपणे 70 हजारांच्या आसपास भाविक दर्शनरांगेत उभे असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यामुळे दर्शनाला वेळ लागत असला. तर विठ्ठलाच्या गर्भगृहात प्रतिमिनिट 40 भाविक दर्शन घेत आहेत. सध्या भाविकांच्या पदस्पर्श दर्शनरांगेत मंदिर समितीच्या वतीने शुध्द फ्ढिल्टर केलेले मिनरल वॉटर तसेच चहा देखिल भाविकांना देण्याचे काम सुरू आहे.

माघी यात्रेंच्या पार्श्वभूमीवर आज भाविक पंढरीत दाखल होत असतानच शुक्रवारची प्रजासत्ताक दिनाची सुट्टी तसेच शनिवार आणि एकादशी दिवशी येणारा रविवार या सलग सुट्टय़ांमुळे मोठय़ा प्रमाणावर भाविक पंढरीत येताना दिसून आले आहेत.

शिवाय संपूर्ण पंढरी नगरी सुध्दा आणि प्रशासनसुध्दा येणा-या माघींच्या सोहळय़ासाठी सज्ज झाली आहे. यामधे चंद्रभागेच्या पैलतीरावर असणारे 65  एकर तसेच चंद्रभागा वाळवंट हे स्वच्छ करून ठेवण्यात आले आहेत. येथील 65 एकरांवर साधारणपणे शासकीय आकडेवारीनुसार 1 लाख 28 हजारांच्या आसपास भाविक वास्तव्यास आहेत. त्यामुळे याठिकाणी प्रशासनाकडून देखिल चांगल्या पध्दतीच्या सोयीसुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत.

यात्रेच्या निमित्ताने जेथे गरज आहे तेथे तात्पुरती शौचालये देखिल बसविण्यात आले आहेत. माघींसाठी मोठया प्रमाणावर पोलिस फ्ढाwजफ्ढाटा देखिल मोठय़ा संख्येने तैनात करण्यात आला असून चंद्रभागेंच्या वाळवंटावर सीसीटीव्ही कॉमेऱयांचा तिसरा डोळाही कार्यन्वित करण्यात आला आहे. एकंदरीतच भावेकांच्या सोयीसाठी येथील प्रशासन संपूर्णपणे तत्पर असलेले दिसून येत आहे.

सध्या संपूर्ण पंढरी नगरी ही भाविकांमुळे फ्gढलून गेली आहे. त्यामुळे येथील हॉटेल्स , लॉजेस , धर्मशाळा या मोठया प्रमाणावर हाउसफ्gढल्ल झाल्या आहेत. अवघी पंढरी ही विठुरायांच्या भक्तीने भारावलेली दिसून येत आहे.

Related posts: