|Friday, January 24, 2020
You are here: Home » leadingnews » दिल्लीत ‘महाराष्ट्र’ अव्वल; चित्ररथाला प्रथम क्रमांक

दिल्लीत ‘महाराष्ट्र’ अव्वल; चित्ररथाला प्रथम क्रमांक 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

  69 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील राजपथवर आयोजित परेड सोहळय़ात महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला. संरक्षणमंत्री निर्मला सितारमन यांच्या हस्ते महाराष्ट्राला पहिलं पारितोषिक देण्यात आले.

  प्रा. नरेंद्र विचारे यांच्या संकल्पनेतून ‘शिवरायांचा राज्यभिषेक सोहळा’ साकारण्यात आला होता. चित्ररथाच्या माध्यमातून शिवरायांचे कौतुक सांगणारा हा देखावा होता. परेड दरम्यान कोल्हापुरच्या संभाजीराजांनी चित्ररथाचे स्वागत केले. परेडमध्ये आसाम दुसऱ्या स्थानावर तर छत्तीसगड चित्ररथाच्या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर राहीला.

 परेडमध्ये एकूण 23 चित्ररथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

 

Related posts: