|Friday, October 18, 2019
You are here: Home » Top News » गोवरची लस दिल्याने नऊ महिन्याच्या चिमुरडीचा मृत्यू

गोवरची लस दिल्याने नऊ महिन्याच्या चिमुरडीचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / बीड

गोवरची लस दिल्याने बीड जिल्हय़ातील परळी येथील एका नऊ महिन्याच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे.

आरती नंदकुमार जाधव असे या चिमुकलीचे नाव आहे. लस दिल्यानंतर दिवसभर आरतीची प्रकृती चांगली होती. मात्र, रात्री तिचा मृत्यू झाला. गोवरची लस दिल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. चिमुकलीचे पार्थिव शवविच्छेदनासाठी अंबेजोगाई येथील स्वामी रामानंदतीर्थ रुग्णालयात नेण्यात आले आहे.