|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शेअर ब्रोकरकडून डॉक्टरसह चौघांची 29 लाखांचा फसवणूक

शेअर ब्रोकरकडून डॉक्टरसह चौघांची 29 लाखांचा फसवणूक 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

एका कंपनीच्या कोल्हापुरातील सहब्रोकरने चौघांच्या सुमारे 29 लाख रूपयांच्या शेअरची खरेदी विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा नोंद झाला आहे.

मुंबईतील अंधेरी पुर्व येथील एका शेअर ब्रोकर कंपनीचा संशयित कुणाल भरत कामत (रा. शिवाजी पेठ) हा सहब्रोकर म्हणून कार्यरत आहे. संशयित कामत हा शेअर खरेदी विक्रीचे काम करतो. 14 जुलै 2014 पासून आजपर्यत त्याने फिर्यादी डॉ. अभिजित अण्णासाहेब पाटील (रा. माळी कॉलनी, राजारामपुरी 13 वी गल्ली) यांची फसवणूक केली. आहे.

डॉ. पाटील यांचे साईक्स एक्टेंशन येथे वर्धन हॉस्पिटल आहे. याच ठिकाणी येवून कामत हा डॉ. पाटील यांच्याशी चर्चा, व्यवहार करत होता. डॉ. पाटील, साक्षीदार विठ्ठल भोसले, विद्या ठकार, डॉ. प्रसाद देसई या चौघांची पुर्वपरवानगी न घेता त्याने त्यांच्या नावे शेअर्सची खरेदी विक्री केली आहे. महिंद्रा बँक शाहूपुरी शाखेचे धनादेश घेऊन संशयित कामत याने डॉ. पाटील यांच्या डी. मॅट खात्यावर भरले. तसेच डॉ. पाटील यांची परवानगी न घेता त्यांच्यी डी मॅट खात्याद्वारे 9 लाख 80 हजार रूपयांची शेअर्स खरेदी विक्री केली. त्यामुळे डॉ. पाटील यांनी कामतयांच्याविरोधात 9 लाख 80 हजारांची फसवणूक केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.

सहब्रोकर कामत याने याच पद्धतीने विठ्ठल अण्णासाहेब भोसले यांची 2 लाख 20 हजार रूपयांची, विद्या भरत ठकार यांची 11 लाख 35 हजार रूपयांची तर डॉ. प्रसाद सुनील देसाई यांची 5 लाख 22 हजार रूपयांची फसवणूक केली आहे.  संशयिताने 28 लाख 87 हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित कामत आणि त्याच्यासह मुंबईतील ब्रोकर कंपनीवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली.

Related posts: