|Friday, January 24, 2020
You are here: Home » leadingnews » आगामी वर्षात देशाचा विकास दर 7 ते 7.5 टक्के राहण्याचा अंदाज

आगामी वर्षात देशाचा विकास दर 7 ते 7.5 टक्के राहण्याचा अंदाज 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

आगामी अर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर 7 ते7.5टक्क्यांच्या आसपास राहील,असा अंदाज केंद्र सरकारकडून सादर करण्यात आलेल्या अर्थिक सर्वेक्षण अहवालात वर्तवण्यात आला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी हा अहवाल संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाल. 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री अरूण जेटली संसदेत अर्थसंकल्प मांडतील. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालाकडे अनेकांचे लक्ष लागले होते. जेटली यांनी हा अहवाल सादर करण्यात आला खनिज तेलाच्या वाढत्या दरांविषयी चिंता व्यक्त केली. मात्र ,केंद्रसरकारच्या महत्त्वपूर्ण आर्थिक सुधारणांमुळे यंदाच्या आर्थिक वर्षात विकासदर 6.75 टक्क्यांपर्यंत पोहोचला. आगामी वर्षात तो वाढून 7 ते 7.5 टक्क्यांपर्यंत जाईल,असे जेटलींना यावेळी म्हटले. तसेच केंद्र सरकारच्या अनुदानामुळे तयार कपडय़ांची निर्यात वाढल्याची बाबही अहवालात नमूद करण्यात आली आहे. आगामी अर्थिक वर्षात विकासदराला चालना देण्यासाठी बचत करण्यापेक्षा गुंतवणुकीच्या माध्यमातून निधी उभारणे जास्त गरजेचे आहे. देशातील राज्यांनी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी थेट कराच्या माध्यमातून वसूल केलेली रक्क्म जगातील इतर संघराज्यीय देशांच्या तुलनेत कमी राहिली, या बाबीही आर्थिक सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे.

 

 

 

 

Related posts: