|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » धर्मा पाटील मृत्यू प्रकरण : सरकारला मागण्या मान्य, मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंब तयार

धर्मा पाटील मृत्यू प्रकरण : सरकारला मागण्या मान्य, मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंब तयार 

ऑनलाइन टीम / मुंबई :

आपल्याला न्याय मिळेपर्यंत आपण वडिलांचा मृतदेह हलवणार नाही असे धर्मा पाटीले यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी सांगितले होते. मात्र आता आमच्या सगळय़ा मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्यामुळे मी त्यांचा मृतदेह ताब्यात घेणार असल्याची माहिती धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी दिली.

जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी न्यायाची मागणी करत विषप्राशन करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे रविवारी रात्री निधन झाले. अखेर वैतागून त्यांनी गेल्या सोमवारी मंत्रालयामध्ये विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, सरकारपेक्षा यात अधिकारीच अधिक जबाबदार असल्याचे ते म्हणाले.तसेच सरकारकडून लेखी आश्वासन देण्यात आले आहे. सरकारने आमच्या सगळय़ा मागण्या मान्य केल्यात आहेत. असे देखील त्यांनी सांगितले.