|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » उद्योग » अमेरिकेत एटीएम हॅकनंतर सावधानतेचा इशारा

अमेरिकेत एटीएम हॅकनंतर सावधानतेचा इशारा 

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिकेत पहिल्यांदाच एटीएम हॅक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर एटीएम उत्पादकांना सावधानतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. एटीएम जॅकपॉटिंगमध्ये हल्लेखोराला दूर अंतरावरून मशिनवर मालवेयरच्या साहाय्याने नियंत्रण मिळविता येते. यानंतर एटीएममधील संपूर्ण रक्कम काढता येते असे सांगण्यात आले. एटीएमवर हल्ला झाल्याचे उघडकीस आल्याचे कंपनीच्या निदर्शनास आणून द्यावे असे एनसीआर कॉर्पोरेशनने म्हटले.

अनेक एटीएममध्ये अजूनही मायक्रासॉफ्टची विन्डोज एक्सपी ही ऑपरेटिंग प्रणाली वापरण्यात येते. या प्रणालीला साहाय्य करण्यास 2014 पासून बंद करण्यात आले आहे. कास्परस्काय लॅब या रशियन कंपनीच्या मते जुन्या हार्टवेयर आणि सॉफ्टवेयर प्रणालीमुळे हे हल्ले करणे सोपे आहे. एटीएममधील सायबर हल्ला पाहता सुरक्षा अधिक मजबूत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 2016 मध्ये युरोपमध्ये काही हल्ले झाल्याचे निदर्शनास आले होते. यापूर्वी बँकांच्या इंटरनेट बँकिंगवर हल्ला करण्यात येत होता, मात्र आत ग्राहकांना लक्ष्य करत हल्ला करण्यात येत आहे.

 

Related posts: