|Monday, August 26, 2019
You are here: Home » क्रिडा » बार्सिलोनाचा विजय

बार्सिलोनाचा विजय 

वृत्तसंस्था / बार्सिलोना

ला लीगा फुटबॉल स्पर्धेत रविवारी येथे झालेल्या सामन्यात  हुकमी स्ट्रायकर लायोनेल मेसीच्या निर्णायक गोलाच्या जोरावर बार्सिलोनाने अल्वेसचा 2-1 अशा गोल फरकाने पराभव केला.

या स्पर्धेच्या गुणतक्त्यात बार्सिलोना 57 गुणांसह पहिल्या स्थानावर असून ऍटलेटिको माद्रीद 46 गुणांसह दुसऱया तर रियल माद्रीद 38 गुणांसह तिसऱया स्थानावर आहे. रविवारच्या सामन्यात बार्सिलोनातर्फे मेसी आणि सुवारेझ यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. 23 व्या मिनिटाला अल्वेसचा एकमेव ग्युडेटीने केला. या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात ऍटलेटिको माद्रीदने लास पामेसचा 3-0 असा पराभव केला. सेव्हिला आणि गेटाफी यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत राहिला.