|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » Top News » ऍक्सिस बँकेची 74 लाखांची रोकड घेऊन गाडीसह चालक फरार

ऍक्सिस बँकेची 74 लाखांची रोकड घेऊन गाडीसह चालक फरार 

ऑनलाईन टीम / पुणे

  पुण्यातील पिंपळे सौदागर येथे आज दुपारी चार वाजता ऍक्सिस बँकेच्या एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी आणलेले 74 लाख रूपये घेऊन गाडीचालक गाडीसह फरार झाल्याची घटना घडली आहे.

  मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील कोकणे चौकात ऍक्सिस बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी चौघेजण गाडीमध्ये पैसे घेऊन आले. त्यापैकी तीन जण बँकेत गेले. याचा फायदा घेत गाडीचालकाने 74 लाख रूपयांची रोकड घेऊन गाडीसह फरार झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास करत आहेत.

 

Related posts: