|Thursday, August 22, 2019
You are here: Home » Top News » 13 वर्षीय मुलीवर बलात्कार करणारा सावत्र बाप अटकेत

13 वर्षीय मुलीवर बलात्कार करणारा सावत्र बाप अटकेत 

ऑनलाईन टीम / पुणे

मागील तीन वर्षापासून 13 वषीय सावत्र मुलीवर बलात्कार करणाऱया पित्याचे बिंग शाळेतील शिक्षकांनी मुलीस विश्वासात घेतल्यानंतर फुटले. याप्रकरणी मुलीच्या आईने पतीविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

पीडित मुलगी ही शाळेत आल्यानंतर इतर मुलांमध्ये न मिसळता मागील काही दिवसांपासून एकटीच शांत बसत होती. त्यामुळे शाळेतील शिक्षकांनी तिला विश्वासात घेऊन तिच्याकडे विचारपूस केली असता तिचा सावत्र पिता तीन वर्षापासून तिच्यावर बलात्कार करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. पीडित मुलीच्या वडिलांचे सन 2010 मध्ये निधन झाल्यानंतर तिच्या आईने दुसरे लग्न केले होते. आई कामानिमित्त घराबाहेर गेल्यानंतर सावत्र पिता ती एकटीच असल्याचा फायदा घेऊन तसेच तिला आंघोळ घालण्याच्या बहाण्याने तिच्यावर वारंवार बलात्कार करीत होता. याबाबत कुठे वाच्यता केल्यास जीवे ठार मारेन, अशी धमकी त्याने दिलेली होती. त्यामुळे निमूटपणे मुलगी लैंगिक अत्याचार सहन करत होती. भेदरलेल्या अवस्थेतच ती राहू लागल्याचे शिक्षकांना दिसून आल्याने त्यांनी तिच्याकडे विचारपूस केली. हा प्रकार मुलीच्या आईला शिक्षकांनी सांगितल्यानंतर याप्रकरणी पीडित मुलीच्या आईनेच पोलीस ठाणे गाठत पतीविरोधात तक्रार दिली. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी आरोपीवर बलात्कार व पास्कोचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.