|Thursday, November 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » आता केवळ 4 रुपयांत मोबाईल पोर्टेबिलिटी

आता केवळ 4 रुपयांत मोबाईल पोर्टेबिलिटी 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

मोबाईल क्रमांक दुसऱया कंपनीकडे वळविण्यासाठीच्या शुल्कात ट्राय या नियामकाकडून कपात करण्यात आली. नवीन नियमानुसार आता ग्राहकांना मोबाईल क्रमांक पोर्टेबिलिटीसाठी केवळ चार रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. यापूर्वी हे शुल्क 19 रुपये होते. गेल्या दोन वर्षांत पोर्टेबिलिटीसाठी लागणाऱया खर्चात घट झाली आहे, तसेच पोर्टेबिलिटी करणाऱया ग्राहकांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. 2009 मध्ये पोर्टेबिलिटी शुल्क 19 रुपये निर्धारित करण्यात आले होते. 29 डिसेंबर रोजी दूरसंचार कंपन्यांना या नवीन प्रस्तावाची माहिती देऊन प्रतिक्रिया देण्यास सांगण्यात आले होते.

Related posts: