|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » चांगभलच्या जयघोषाने बिळूर काळभैरवनाथ यात्रेस प्रारंभ !

चांगभलच्या जयघोषाने बिळूर काळभैरवनाथ यात्रेस प्रारंभ ! 

वार्ताहर/ वळसंग

महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेले जत तालुक्यातील बिळूर येथील श्री. काळभैरवनाथ देवाच्या यात्रेस चांगभलंच्या जयघोषाने कालपासून प्रारंभ झाले असुन हजारो भाविक यात्रेसाठी बिळूर मध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे बिळूर परिसर भक्तीमय वातावरणाने फुलून गेला आहे.

काल सकाळी सात वाजता सर्व भक्त देवळा पासुन श्रीं चा घोडा घेऊन वाजत, गाजत आठ वाजता नागझरीत पोहचले. श्री शिकार खेळुन आल्यामुळे उग्र अवस्थेत असतात. काल परमेश्वराला शांत करण्यासाठी आंबील व आंबट भात नैवघ्द दाखवून भाविक प्रसाद घेतले. नागझरीतुन सकाळी नऊ वाजता परततात व सकाळी आकरा वाजता देव देवळात पोहचतो.

आज गुरूवार रोजी सकाळी दहा वाजता मिरजेचे मानकरी बापू किसन चौगुले (नगारवाले) यांचा पुरणपोळी व भांगाचा नैवेद्य दाखविल्यानंतर मग भाविकांचा नैवेद्य दाखवितात.

शुक्रवार दि. 2 रोजी श्री. च्या घोडय़ाचे पुजन करुन जकगोंड व जाबगोंड हे दोन हरबंडी पहाटे चार वाजता देवळासमोर नेऊन थांबवतात गावातील बैलजोडय़ाचे मालक नारळ फोडुन बैलाचे खांदा लावून घेऊन जातात सकाळी सहा वाजता सुरेश व कल्लाप्पा सुतार यामानकरांचे बैल जंपून तेथुन गावकरी आणि भाविक बैलगाडी हरबंडीला जुंपून दहा वाजता नागझरीत पोहचतात. गावातील विरक्त गुरूबसवेश्वर मठाचे मानकरी नागझरीत पोहचतात. येथील दोन हरबंडी पैकी एक हरबंडीला मानकरी राजेंद्र मलकणगोंडा पाटील यांची बैलजोडी तर दुसरी जावगोंड हरबंडीला विरक्त गुरूबसवेश्वर मठातील बैलजोडी जुंपतात. नंतर चार वाजता हरबंडीचे वाजत, गाजत आगमन होते. नंतर गावातुन मिरवणूक काडुन सात वाजता हरबंडी मंदीरा समोर पोहचते.

रविवार दि. 4 रोजी पहाटे पाच वाजता श्री ची विधीवत पुजा होते. सकाळी आकरा वाजता मंदीरामागे बैलगाडीत वाळूचे पोते भरुन बैलगाडीची स्पर्धा घेतली जाते सायंकाळी चार वाजता बक्षीस वितरण केले जाते. त्यानंतर गावातील पुजारी भक्तांचे घुगळ कार्यक्रमास सुरवात होते. रात्री आठ वाजल्यापासुन दुसऱया दिवसापर्यंत दंडवत घालण्याचा कार्यक्रम होतो. रात्री 12 वाजता पालखी पाच प्रदक्षिणा घालते व आशा प्रकारे यात्रेची सांगता होते. सदर यात्रा ही बुधवार ते रविवार अखेर भरविण्यात येणार असून यात्रेत भाविकांसाठी सर्व सुख सुविधांची सोय केल्याचे माहिती देवस्थान कमिटीचे चेअरमन सोमनिंग जिवाण्णावर, व्हा. चेअरमन रामाण्णा भाविकटटी, व सचिव संगाप्पा जिवाण्णावरसह सदस्यांनी दिली आहे.