|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » महात्मा बसवेश्वर स्मारकाचा आराखडा तात्काळ तयार करा

महात्मा बसवेश्वर स्मारकाचा आराखडा तात्काळ तयार करा 

प्रतिनिधी /सोलापूर :

मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर स्मारकाचे आराखडे व अंदाज पत्रके तात्काळ तयार करा, असे आदेश अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱयांना †िदले. सोलापूर जिह्याच्या विकास आराखडय़ाची बैठक आज गुरुवारी घेण्यात आली. बैठकीत त्यांनी हे आदेश दिले. बैठकीला पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आ. गणपतराव देशमुख, आ. बबनराव शिंदे, आ. हणुमंतराव डोळस, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते.

या बैठकीत सोलापूर जिह्याचा 2018-19 या वर्षाचा आराखडा सादर करण्या त आला. मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकाची घोषणा अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. त्या अनुषंगाने पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी या स्मारकाच्या आराखडय़ा विषयी पाठपुरावा केला होता. या बैठकीत मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर स्मारकाबाबत आर्थिक तरतूद करण्याची विनंती पालकमंत्री देशमुख यांनी अर्थमंत्र्यांना केली. त्यावेळी अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी महात्मा बसवेश्वर स्मारकाचा आराखडा व अंदाजपत्रक तात्काळ तयार करण्याचे आदेश सोलापूरचे जिल्हाधिकारी भोसले यांना दिले.

बैठकीच्या वेळी अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी सोलापूर जिह्याच्या वार्षिक योजनेस लागू केलेली 30 टक्के कपात मागे घेत असल्याबाबत घोषणा केली. त्यामुळे सुमारे 95 कोटी रुपये अतिरिक्त निधी उपलब्ध होणार आहे. ही कपात मागे घेतल्याबद्दल पालकमंत्री देशमुख यांनी अर्थमंत्री मुनगंटीवार यांचे आभार मानले. याचबरोबर आता जिल्हा वार्षिक योजनेतून दुरुस्तीसाठी निधी खर्च करता येणार असून, याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला असल्याची माहिती अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी दिली.