|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » Top News » ‘पद्मावत’पाहायला गेलेल्या तरूणीवर बलात्कार

‘पद्मावत’पाहायला गेलेल्या तरूणीवर बलात्कार 

ऑनलाईन टीम / हैदराबाद :

‘पद्मावत’चित्रपट पाहायला गेलेल्या तरूणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना हैद्राबादमध्ये घडली आहे. याप्रकरणी आरोपला अटक केली असून त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन महिन्यापूर्वीच या मुलीची कंदकतला बिक्शापथी नावाच्या तरूणाशी सोशल मीडियावर ओळख झाली होती.त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. 31 जानेवारीला हे दोघे ‘पद्मावत’ चित्रपट पाहण्यासाठी थिएटमध्ये गेले हाते. थिएटरमध्ये कमी प्रेक्षक असल्याने त्याचा गैरफायदा घेत या तरूणाने सदर तरूणीवर बलात्कार केला. तरूणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला अटक केले व कोर्टासमोर हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

 

 

 

 

Related posts: