|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Top News » बोफोर्सप्रकरणी सीबीआयचे बारा वर्षांनंतर आव्हान

बोफोर्सप्रकरणी सीबीआयचे बारा वर्षांनंतर आव्हान 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सीबीआयने अपील केले आहे. 64 कोटींच्या बोफोर्स घोटाळयाच्या आरोपींना आरोपमुक्त करण्याच्या दिल्ली हायकोर्टाच्या 2005 च्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले आहे.

याप्रकरणी हायकोर्टाने यूरोपमध्ये राहणारे उद्योगपती हिंदुजा बंधू आणि बोफोर्स कंपनी विरूद्धचे सर्व आरोप फेटाळले आहेत. ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल राव यांनी बारा वर्षांनंतर अपील करू नका, असा सल्ला दिला होता. याबाबत तपास पथकाने हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिल्याने या प्रकरणाला महत्व प्राप्त झाले आहे. स्वीडनची शस्त्रकंपनी एबी बोफोर्सने बनवलेल्या 410 बोफोर्सच्या तोफा 1987 साली भारताने खरेदी केल्या होत्या. बोफोर्स व्यवहारानंतर एक वर्षांनंतर स्वीडनच्या सरकारी रेडिओने बोफोर्स कंपनीविरोधात याप्रकरणी 64 कोटी रूपयांची दलाली घेतल्याची बातमी दिली होती. दिल्लीतील कोर्टाने 2011 मध्ये क्कात्रोचीच्या बोफोर्सच्या दलाली प्रकरणातील चौकशी बंद करण्याला मंजुरी दिली होती.

 

 

Related posts: