|Sunday, December 8, 2019
You are here: Home » उद्योग » अर्थसंकल्पामुळे भारताचे मानांकन फिचने रोखले

अर्थसंकल्पामुळे भारताचे मानांकन फिचने रोखले 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

गुरुवारी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामुळे भारताचे मानांकन सुधारण्यासाठी विलंब करण्यात आल्याचे फिच या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने म्हटले. सरकारवरील कर्जाचे वाढते प्रमाण पाहता मानांकन रोखण्यात आल्याचे म्हटले. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पुढील वर्षात वित्तीय तूटीची लक्ष्य 3.2 टक्क्यांवरून 3.5 टक्के केले आहे. अर्थसंकल्पात आर्थिक गरजा आणि सामाजिक सुधारणांसाठी नवीन उपक्रमांची घोषणा केली. यामध्ये कृषी उत्पन्न वाढविण्याबरोबरच नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यासह आरोग्य विमा योजनेचाही समावेश आहे.

सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या योजनांवर योग्य प्रकारे खर्च करण्यात आल्यास देशातील मोठय़ा प्रमाणातील मतदारांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तो योग्य ठरेल. सरकारची कमजोरी वित्तीय स्थिती पाहता भारताचे मानांकन सुधारण्यासाठी विलंब करण्यात आला आहे. सरकारच्या डोक्यावर आता जीडीपीच्या साधारण 68 टक्के कर्जाचे ओझे आहे आणि राज्यांच्या कर्जाचा समावेश करण्यात आल्यास वित्तीय तूट जीडीपीच्या 6.5 टक्के आहे, असे फिच रेटिंगचे भारतातील संचालक थॉमस रुक्माकर यांनी म्हटले.

सरकारकडून वित्तीय तुटीला जीडीपीच्या 3 टक्क्यांपर्यंत नेण्यासाठीचे लक्ष्य 2020-21 पर्यंत वाढविण्यात आले आहे असे त्यांनी म्हटले. फिचने गेल्या वर्षी मे महिन्यात भारतातील कमजोर वित्तीय स्थितीचा अहवाल देत भारताचे मानांकन बीबीबी उणे स्थिर ठेवले होते.

Related posts: