|Friday, December 6, 2019
You are here: Home » उद्योग » लाँग टर्म कॅपिटल टॅक्सने बाजार कोसळला

लाँग टर्म कॅपिटल टॅक्सने बाजार कोसळला 

बीएसईचा सेन्सेक्स 840, एनएसईचा निफ्टी 256 अंशाने गडगडला

वृत्तसंस्था/मुंबई

गेल्या महिन्यात सतत विक्रमी पातळी गाठणाऱया बाजार शुक्रवारी गडगडला. बाजारात नफा कमाई झाल्यानंतर अर्थसंकल्पात लाँग टर्म कॅपिटल टॅक्स आकारण्यात येणार असल्याची तरतूद करण्यात आल्याने बाजार कोसळला. दिवसभरात बाजारात केवळ विक्री झाल्याने गुंतवणूकदारांना 5 लाख कोटी रुपयांना फटका बसल्याचे सांगण्यात आले. सेन्सेक्स आणि निफ्टी 2.25 टक्क्यांपेक्षा जास्तने घसरत बंद झाले. दिवसभरातील कमजोरीदरम्यान निफ्टी 10,736 आणि सेन्सेक्स 35,006 पर्यंत घसरला होता.

बीएसईचा सेन्सेक्स 840 अंशाने कोसळत 35,067 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 256 अंशाने गडगडत 10,760 वर स्थिरावला. बँक निफ्टी 2.8 टक्क्यांनी कमजोर होत 26,451 वर बंद झाला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात सर्वाधिक विक्री झाली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 4 टक्क्यांनी घसरत 16,575 वर बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 19,760 वर बंद झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 4.7 टक्क्यांनी घसरत 17,850 वर बंद झाला. निफ्टीचा स्मॉलकॅप निर्देशांक 6 टक्क्यांनी कोसळत 8,251 वर स्थिरावला.

आयटी वगळता सर्व क्षेत्रांच्या निर्देशांकात घसरण झाली. निफ्टीचा वाहन निर्देशांक 3.4 टक्के, मीडिया निर्देशांक 3.5 टक्के, धातू निर्देशांक 3 टक्के, औषध निर्देशांक 1.25 टक्के, पीएसयू बँक निर्देशांक 2.9 टक्के, खासगी बँक निर्देशांक 3 टक्क्यांनी घसरले. बीएसईचा भांडवली वस्तू निर्देशांक 3.6 टक्के, ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक 3.4 टक्के, ऊर्जा निर्देशांक 4 टक्के, रियल्टी निर्देशांक 6.3 टक्के, तेल आणि वायू निर्देशांक 3 टक्क्यांनी कमजोर झाले.

दिग्गज समभागांची कामगिरी

टेक महिंद्र, एचसीएल टेक, टीसीएस 1.4-0.5 टक्क्यांनी वधारले. भेल, बजाज फायनान्स, टाटा पॉवर, बजाज ऑटो, अल्ट्राटेक सिमेंट, भारती एअरटेल, ऍक्सिस बँक, मारुती सुझुकी 7-4.3 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅप समभागात टोरेन्ट फार्मा, मॅक्स फायनान्शियल, ग्लेनमार्क फार्मा 1-0.3 टक्क्यांनी वधारले. अदानी पॉवर, रिलायन्स कॅपिटल, रिलायन्स कम्युनिकेशन्स, एमआरपीएल, रिलायन्स इन्फ्रा 11.2-8.7 टक्क्यांनी कोसळले.

स्मॉलकॅप समभागात डीएफएम फुड्स, वॉटरबेस, पॉलि मेडिक्योर, ऑर्बिट एक्सपोर्ट्स, कॅप्लिन लॅब्स 6.9-2.5 टक्क्यांनी वधारले. पीसी ज्वेलर, सोरिल इन्फ्रा, बॉम्बे डाईंग, जिंदाल सॉ, इंडिया ग्लायकोल्स 24.4-12.75 टक्क्यांनी घसरले.

Related posts: