|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सरकारी अर्जांवर उपाध्याय यांची प्रतिमा कशाला?

सरकारी अर्जांवर उपाध्याय यांची प्रतिमा कशाला? 

काँग्रेसचे प्रदेशाध्याक्ष शांताराम नाईक यांचा सवाल

प्रतिनिधी/ पणजी

सरकारच्या व प्रामुख्याने खाण खात्याच्या अर्जावरील दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला काँग्रेसने आक्षेप घेऊन विरोध दर्शवला आहे. ती प्रतिमा काढून टाकण्याची मागणी केली आहे. सरकारच्या अर्जावर उपाध्याय यांची प्रतिमा कशाला? असा सवालही प्रदेश काँग्रेस अध्यक्ष शांताराम नाईक यांनी केला आहे.

पणजीत शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नाईक यांनी सांगितले की उपाध्याय व त्यांची कृती भारतीय स्वातंत्र्य लोकशाहीच्या विरोधात होती. सर्व धर्म समभाव त्यांना माहितच नव्हता. शिवाय ते घटनेच्या विरोधात होते. मुस्लीम-ख्रिश्चन यांना जर भारतीय देशात रहायचे असेल तर त्यांनी त्यांची ओळख विसरुन हिंदू व्हावे, अशी उपाध्यायांची धारणा होती. अशा माणसाला डोक्यावर घेऊन बसण्याचे भाजपला कारणाच काय? असा प्रश्न नाईक यांनी मांडला. सरकारी अर्जावर उपाध्याय यांच्या प्रतिमेची गरज नाही. म्हणून त्यांचा मोनोग्राम (चिन्ह) काढून टाकावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

पर्रीकर महिलांचा अपमान करतात

नारळ विक्री वरुन काँग्रेसच्या महिलांवर आगपाखड करणाऱया मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनाही शेवटी रस्त्यावर येऊन नारळ विक्री करावी लागली याकडे नाईक यांनी लक्ष वेधले आणि महिला काँग्रेसचे अभिनंदन केले. महिलांचा पर्रीकर अशाच प्रकारे अपमान करीत राहणार आहेत काय? अशी विचारणा नाईक यांनी केली.

उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध पदांच्या भरतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याची टीकाही त्यांनी केली. दक्षता खात्याने याची दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली.

Related posts: