|Thursday, December 12, 2019
You are here: Home » leadingnews » अंडर -19; पृथ्वीसेनेला जगज्जेतेपद

अंडर -19; पृथ्वीसेनेला जगज्जेतेपद 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

यूझीलंडमध्ये पार पडलेल्या एकोणीस वर्षाखालील वन डे क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारताने चौथ्यांदा  विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. या ऐतिहासिक विजयानंतर बसीसीआयने टीम इंडियाला प्रत्येक खेळाडूसाठी बक्षीस जाहीर केले आहे.

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला अवघ्या 216 धावांत गुंडाळले व भारतापुढे विजयासाठी 217 धावांचे आव्हान टीम इंडियाने अवघ्या 38.5 षटकातच पूर्ण केले. मनजोत कालरच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने कांगारूंवर तब्बल 8 गडी राखून मात केली. मनजोतने 101 चेंडून नाबाद 102 धावा केल्या.प्रशिक्षक  राहुल द्रविड यांनी  प्रचंड मेहनत घेतली व स्वतःचे अस्तित्व  सिद्ध  केले आहे.

बीसीआयने या विजयानंतर प्रशिक्षक राहूल द्रविडला 50 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. यासोबतच प्रत्येक खेळाडू व स्टाफला 20 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.

 

 

 

Related posts: