|Sunday, December 15, 2019
You are here: Home » उद्योग » आधार अपडेट करण्यावर आता जीएसटी लागणार

आधार अपडेट करण्यावर आता जीएसटी लागणार 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

यूआयडीएआयकडून आधारमधील माहिती सुधारित करण्यासाठीच्या शुल्कावर जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामूण्s आधार माहिती अपडेट करणे पाच रुपयांनी महाग होणार आहे. यूआयडीएआयच्या निर्णयानुसार काही सेवांवर शुल्क आकारण्यात येते, तर काही सेवा मोफत दिल्या जातात.

लहान मुलांव्यतिरिक्त मोठय़ांच्या बायोमेट्रिक माहितीमध्ये सुधारणा करण्यासाठी यूआयडीएआयने जीएसटी वगळता 25 रुपये शुल्क निर्धारित केले आहे. याव्यतिरिक्त नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, लिंग आणि ईमेल अपडेट करण्यासाठी 25 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. या सेवांवर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येणार असल्याने एकूण 29.50 रुपये द्यावे लागतील.

आधार कृष्णधवल प्रिन्ट काढण्यासाठी 10 रुपये आणि रंगीत प्रिन्टसाठी 20 रुपये शुल्क आहे. आधार नोंदणी मोफत आहे. काही सेवा केंद्रांमधून मोठय़ा प्रमाणात शुल्क वसूल करण्यात येत असल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. कोणत्याही सेवा केंद्रातून निर्धारित शुल्कापेक्षा अधिक दर आकारल्यास 1947 या मदत केंद्रावर कॉल करावा अथवा help@uidai.gov.in  या ईमेल आयडीवर तक्रार करावी. या तक्रारीनंतर प्राधिकरणानंतर कारवाई करण्यात येईल. या व्यतिरिक्त पावती घेण्यास विसरता कामा नये असे सांगण्यात आले.

Related posts: