|Monday, December 9, 2019
You are here: Home » उद्योग » मनरेगांतर्गत राज्यांना 51,600 कोटी

मनरेगांतर्गत राज्यांना 51,600 कोटी 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्यासाठी सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या मनरेगा योजनेसाठी केंद्र सरकारकडून राज्यांना 51,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम देण्यात आली असे सांगण्यात आले. ग्रामीण भागात सरकारकडून अनेक प्रकल्पांवर काम करण्यात येत आहे. राज्यांकडून हे काम सुरू असून त्यासाठी आवश्यक असणारा निधी पुरविण्याचे काम सरकार करत आहे. चालू आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारकडून राज्यांना 31 जानेवारीपर्यंत 51,616.99 कोटी रुपये देण्यात आले असे ग्रामीण विकास राज्यमंत्री राम कृपाल यादव यांनी राज्यसभेत सांगितले.

मनरेगांतर्गत देयक देण्यास विलंब झाल्याने सरकारकडून अतिरिक्त 75.89 कोटी रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्यात आलेत. ही देयके देण्यास अनेक कारणांनी विलंब झाला. पर्यायी कर्मचाऱयांची कमतरता, हजेरी नोंदविण्यास विलंब होणे, वेतन यादी उशिराने मिळणे, अर्थव्यवस्था प्रणाली आणि अन्य कारणे आहेत. वेतन देण्यास विलंब झाल्यास प्रतिदिनी 0.05 टक्के दराने नुकसान भरपाई देण्यात येते. तत्काळ वेतन देण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही, त्यांना पोस्ट ऑफिस आणि बँक खात्यामध्ये ईलेक्ट्रॉनिक माध्यमातून रक्कम देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

 

Related posts: