|Sunday, January 26, 2020
You are here: Home » उद्योग » जानेवारीत सेवा क्षेत्रात वेगाने वाढ

जानेवारीत सेवा क्षेत्रात वेगाने वाढ 

नवी दिल्ली

 देशातील सेवा क्षेत्रात जानेवारी महिन्यात सर्वाधिक वेगाने वाढ नोंदविण्यात आली. नवीन मागणीमध्ये वाढ नोंदविण्यात आल्याने गेल्या महिन्यात हा निर्देशांक तीन महिन्यातील सर्वाधिक वेगवान कामगिरी करणारा ठरला आहे. जानेवारी महिन्यात निक्केई सेवा निर्देशांक 51.7 वर पोहोचला आहे. गेल्या महिन्यात तो 50.9 वर होता. गेल्या सलग दोन सत्रात हा निर्देशांक वाढत आहे. जानेवारी महिन्यात सेवा क्षेत्रात रिकव्हरी दिसून आली. जून 2017 पासून हा क्षेत्रात तेजी येत आहे. रोजगारनिर्मितीमध्ये वाढ होत आहे, मात्र जीएसटीमुळे वेतन देण्यासाठी विलंब होत आहे. सप्टेंबरनंतर पहिल्यांदाच रोजगारनिर्मितीमध्ये वाढ झाली आहे. खासगीसह संपूर्ण देशातील सेवा क्षेत्रात वेगाने वाढ झाल्याचे अर्थशास्त्रज्ञा आश्ना ढोकिया यांनी म्हटले. निक्केई निर्देशांकानुसार डिसेंबरमध्ये उत्पादनात वाढ झाली असून गेल्या 60 महिन्यातील सर्वाधिक आहे.

 

Related posts: