|Thursday, December 5, 2019
You are here: Home » उद्योग » महाराष्ट्रातील 7 हजारांहून अधिक खेडय़ांत व्होडाफोनचे जाळे

महाराष्ट्रातील 7 हजारांहून अधिक खेडय़ांत व्होडाफोनचे जाळे 

वृत्तसंस्था/मुंबई

महाराष्ट्र आणि गोव्यातील 7 हजारपेक्षा अधिक गावात व्होडाफोन सुपरनेट 4जीचे जाळे पसरले आहे. दोन राज्यांसाठी एकच सर्कल असल्याने 2 कोटीहून अधिक ग्राहकांना उत्तम सेवा पुरविण्यासाठी कंपनीकडून जाळे अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येत आहे. ग्राहकांना उत्तम इंटरनेट आणि व्हॉईस सेवा देण्यासाठी कंपनीकडून नेहमीच प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रत्येक तासाला एक यानुसार 9,200 पेक्षा अधिक टॉवरचे जाळे आहे.

महाराष्ट्र आणि गोव्यातील स्मार्टफोनधारकांना व्होडाफोनच्या सुपरनेट 4जी परिवारात सहभागी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. दोन्ही राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागात इंटरनेट वापरामध्ये वाढ नोंदविण्यात येत आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार आकर्षक प्लॉन कंपनीकडून दाखल करण्यात येत आहेत. लाखो ग्राहकांच्या मागणीला अनुसरून कंपनीकडून जाळे विस्तारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात येत आहे, असे व्होडाफोनच्या महाराष्ट्र आणि गोवा सर्कलचे व्यवसाय प्रमुख आशिष चंद्रा यांनी म्हटले.

Related posts: