|Thursday, December 5, 2019
You are here: Home » उद्योग » ओएनजीसीच्या सर्वात मोठय़ा प्रकल्पाला विलंब

ओएनजीसीच्या सर्वात मोठय़ा प्रकल्पाला विलंब 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ओएनजीसी कंपनीला आपल्या सर्वात मोठय़ा खनिज तेल प्रकल्पाला विलंबाने सुरुवात करावी लागणार आहे, असे सांगण्यात आले. देशातील सर्वात मोठी तेल उत्पादक असणाऱया कंपनीकडून कृष्णा गोदावरी खोऱयातून वायूचे उत्पादन घेण्यात येणार आहे. कंपनीच्या योजनेनुसार जून 2019 पासून या क्षेत्रातून उत्पादन घेण्याचा प्रयत्न आहे. मात्र 2020 च्या दुसऱया सहामाहीपासून प्रत्यक्षात उत्पादनास सुरुवात होण्याची शक्यता आहे.

ओएनजीसीचा हा प्रकल्प 5 अब्ज डॉलर्स किमतीचा आहे. कृष्णा गोदावरी खोऱयात वायूचे उत्पादन घेण्यात आल्यानंतर तेलाला सुरुवात करण्यात येईल. उत्पादन आणि सेवांसाठी आवश्यक असणाऱया वस्तुंसाठी कंपनीकडून अद्याप निविदा जारी करण्यात आलेली नाही. बंगालच्या उपसागरातील केजी-डीडब्ल्यूएन-98/2 क्षेत्रातून उत्पादन घेण्यात येणार आहे. हे क्षेत्र मेक्सिकोच्या आखातापेक्षा अधिक खोल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खनिज तेलाची आयात कमी करत देशातील उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ओएनजीसीकडे सध्या असलेल्या जुन्या खाणीतील उत्पादन वेगाने घटत आहे. देशातील उत्पादन वाढविण्यासाठी 2030 पर्यंत 11 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

कंपनीकडून अद्याप निविदा जारी करण्यात आलेली नाही याचा अर्थ कंपनीकडून पुढील वर्षापासून काम करण्यास सुरुवात करण्यात येणार नाही. या क्षेत्रातील हवामान पर्यावरणास प्रतिकूल असल्याने वर्षातील सहा महिनेच बांधकाम करता येतात. लवकरच निविदा जारी करण्यात आल्यास 2020 च्या दुसऱया सहामाहीपासून उत्पादन घेण्यात येईल. ओएनजीसीने 15 दशलक्ष चौरस मीटर प्रतिदिनी वायू आणि 77 हजार पिंप तेलाचे उत्पादन घेण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.

Related posts: