|Sunday, December 8, 2019
You are here: Home » उद्योग » खासगी कंपनीप्रमाणे सरकार काम करत नाही

खासगी कंपनीप्रमाणे सरकार काम करत नाही 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्र सरकारला खासगी कंपनीप्रमाणे काम करता येत नाही. राज्यांबरोबर काम करताना व्यावहारिक संबंध दूर ठेवावे लागतात. सामान्य नागरिकांसाठी कोणतीही योजना सहज उचलता येत नाही असे त्यांनी म्हटले. कोणत्याही व्यक्तीची निवड करत योजना कार्यरत करण्यात आल्यास भ्रष्टाचार आणि लालफितीचा कारभार सुरू होईल.

दशकभरापूर्वीच्या कायद्यानुसार राज्यांना व्यावहारिकरित्या मुक्तपणे काम करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते. मात्र आता त्यांना नागरिकांच्या गरजा पाहता काम करणे आवश्यक आहे. कंत्राट जाहीर करणे अथवा सार्वजनिक खासगी कंत्राटासाठी सरकारला नियमांच्या आधारे कार्य करावे लागते. नागरिकांना उत्तम सुविधा देण्यासाठी सरकारला वेळेचे नियंत्रण पाळावे लागते आणि व्यवहारात पारदर्शकता येईल याचीही काळजी घ्यावी लागते. कंपनीची स्थापना ही नफा कमविण्यासाठी असते, तर सरकारला नागरिकांसाठी पायाभूत सुविधा मजबूत करण्यास प्राधान्य द्यावे लागते, असे त्यांनी म्हटले.

Related posts: