|Sunday, September 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » फ्रान्सच्या बेटावर स्पेनचा हक्क

फ्रान्सच्या बेटावर स्पेनचा हक्क 

6 महिन्यांच्या कालावधीसाठी निर्णय

वृत्तसंस्था/ पॅरिस

फ्रान्स स्वतःच्या सीमेला लागून असलेले बेट बास्क्यू बीच रिसॉर्ट चालू आठवडय़ात स्पेनला सोपविणार आहे. 3 हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असणारे हे बेट 6 महिन्यानंतर स्पेन पुन्हा सन्मानपूर्वक फ्रान्सला परत करणार आहे. हेनडेय येथील बास्क्यू बीच रिजॉर्ट फ्रान्सचे अंतिम ठिकाण असून यानंतर स्पेनची हद्द सुरू होते. या अदलाबदलीला कोणत्याही प्रकारचा विरोध होणार नाही.

350 वर्षे जुनी परंपरा

बेटाच्या या अदलाबदलीचा इतिहास जवळपास साडेतीनशे वर्षे जुना आहे. 1659 मध्ये या बेटाच्या अधिकारावरून फ्रान्स आणि स्पेनमध्ये 3 महिन्यांपर्यंत संघर्ष चालला. यानंतर दोन्ही देशांनी परस्पर सहमतीने याचे अधिकार 6-6 महिन्यांपर्यंत विभागण्याचा करार केला. दोन्ही बाजूंकडून लाकडी सेतू तयार करण्यात आल्यानंतर दोन्ही देशांदरम्यान करार अस्तित्वास आला.

शाही विवाह

फ्रान्सचे राजपुत्र लुइस 15 आणि स्पेनचे राजा फिलिप 4 यांच्या कन्येचा शाही विवाह या कराराचा साक्ष ठरला. यानंतर दोन्ही देशांकडे या बेटाचा अधिकार सहा महिन्यांपर्यंत राहतो.