|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

महाशिवरात्रीचे कुलदेवता व शिवपूजन शापीत दोष निवारक

बुध. दि. 7 ते 13 फेब्रुवारी 2018

पुढील मंगळवार दि. 13 फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे. सर्व भूतप्रेत, तृप्त, अतृप्त आत्मे, शाप तळतळाट, समंधबाधा, पिशाच्च बाधा, महादेवाला वचकून असतात. शंकराची ही आवडती तिथी आहे. घराण्यातील पूर्वजांचे सर्व दोष जाण्यासाठी या दिवशी शिवपूजन करतात. 13, 14 च्या मध्यरात्री 12.28 ते 1.18 या दरम्यान महादेवाची कृपा लाभण्याचा पुण्यकाल आहे. या मध्यरात्री जे कुणी शिवाचे पूजन करतील त्यांचे घराण्यातील सर्व दोष नष्ट होतात. शक्मयतो ही पूजा मंत्रपठण वगैरे घरीच करावी. महादेवाची अनेक जागृत मंदिरे आहेत. तेथे जावून दर्शन घेतले व बेलवृक्षाची पूजा केली तरी चालू शकते. कोणत्याही जागृत तीर्थक्षेत्री लोक जातात पण पिकनिक साजरी करतात. देवाधर्माचा अथवा भक्तीचा लवलेशही तेथे दिसत नाही. त्या देवस्थानचे बाजारीकरण करून देवदर्शनासाठी येणाऱया भक्तांना अक्षरश: लुबाडतात. नारळ फोडला पैसे द्या, पार्किंग सोय नसतानाही गाडी लावली पार्किंग फी द्या, देवाचे दर्शन लवकर हवे असेल तर पैसे द्या, देवाचे तीर्थ हवे, गंध लावले किंवा साधे पाया पडले तरी पैसे द्या असे प्रकार सर्रास सुरू असतात. अशा गोष्टी होवू नयेत अन्यथा पुढेमागे त्याचा निश्चितच फटका बसतो. देवाचे पावित्र्य हे अबाधित ठेवावे लागते. त्याच्या पावित्र्याला बाधा येईल असे कुणीही वागू नये. आजकाल महाशिवरात्री किंवा इतर पर्वकालात लोक तीर्थयात्रा अथवा जागृत स्थानाला जातात पण त्यांचा हेतू देवदर्शन नसून पिकनिक हाच असतो. पिकनिक म्हटल्यावर दंगामस्ती, व्यसने, छेडछाड, मद्य, मांसाहार या बाबी आल्याच. त्यामुळे देवाचे पावित्र्य भंग झाल्यामुळे तीर्थस्थळावरून परतताना भयानक अपघात होऊन कित्येक लोक दगावतात अथवा कायमचे जायबंदी होतात. तीर्थयात्रेहून परत येताना जाताना अपघात का होतात त्याचे हे महत्त्वाचे कारण आहे. काही विशिष्ट मागणे अथवा नवस फेडण्यासाठी जर कुलदेवाला अथवा तीर्थक्षेत्री जाण्याचा प्रसंग आल्यास कुणाच्या घरी अथवा इतरत्र न जाता सरळ  घरी यावे. त्रिपिंडी नारायण नागबली, कालसर्पयोग शांती हे कर्म आहे ते चुकूनही घरी करू नये. या शांती केल्यानंतर सुतक येते. त्यामुळे कोणाच्या घरी जावू नये, अन्यथा त्यांनाही सुतक लागून त्रास सुरू होतात. घरी येवून आणखी एक शांती असते ती करावी लागते. अन्यथा घरात दुर्घटनांची मालिका सुरू होते. नोकरी, व्यवसाय, डबघाईला येतात. शिक्षण अर्धे पडते. संसार बिघडतात. तीर्थक्षेत्री वरील विधी केल्यानंतर घरी दुसरे काही करायची आवश्यकता नाही असे तेथील पुरोहित सागंतात पण हे चुकीचे आहे. लोकांना धार्मिकतेचे थोडे तरी ज्ञान असणे आवश्यक आहे. म्हणजे पूजा अर्चा व्यवस्थित झाली की नाही हे त्यांना सहज कळू शकेल. महाशिवरात्रीला कुलदेवतेचे पूजनही अवश्य करावे व नंतर इतर देवतांचे करावे काही तथाकथित संत, बाबा, बुवा, महाराज अमूक एक पंथाची दिक्षा घेतल्यावर अथवा अमुक मंत्राचा अनुग्रह स्वीकारल्यावर इतर कोणत्याही देवतेचे पूजन करण्याची जरुर नाही, असे सांगतात, पण तसे करू नका. कुलदैवत पूजन हे अती महत्त्वाचे आहे.

 

मेष

अनेक महत्त्वाच्या घडामोडी या आठवडय़ात घडतील. धनलाभाच्या संधी येतील. रवी, बुध युती लाभदायक असल्याने दैवी कृपा लाभेल. मंगळ, शनि, मानसिक गेंधळ निर्माण करील. काही ठरलेली कामे अचानक बदलावी लागतील. रवी, चंद्राचा शुभयोग घराण्याचा उत्कर्ष करील. शुभवार्ता समजतील न होणारी अनेक कामे हातावेगळी होतील.


वृषभ

मोठय़ा कामात दिरंगाई निर्माण होण्याची शक्मयता आहे. शारीरिक व्याधीपासून जपावे लागेल. शनि, मंगळ अचानक प्रवास, धनलाभ, मित्रमंडळींचे सहकार्य या द=िष्टने चांगली फळे देईल. पण कोणतेही काम सहजपणे होणार नाही. एखाद्या मोठय़ा व्यक्तीचे महत्त्वाचे काम तुमच्यामुळे होईल व त्याचा फायदाही होईल. कर्जप्रकरणे मिटतील.


मिथुन

महाशिवरात्री आठव्या स्थानी होत आहे. आरोग्य आर्थिक स्थिती, कर्ज प्रकरणे, घरगुती सौख्य, प्रवास,मोठी कामे यासाठी हा सप्ताह वैशिष्टय़पूर्ण ठरेल. अनेक महत्त्वाच्या कामात यश  देणारे ग्रहमान आहे. देवधर्माकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. संततीच्या बाबतीत स्थित्यंतरे घडतील. कुणालाही या आठवडय़ात शब्द देताना जागरुक रहा.


कर्क

शुक्र व बुधाचे सहकार्य तुम्हाला अनेक गोष्टीत चांगले यश देईल. तुमच्या चांगुलपणाचा कुणी फायदा घेणार नाही, यासाठी जपावे लागेल. शनि, मंगळाचा योग आर्थिक हानी दर्शवित आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीस अनुकूल नाही. मोठय़ा प्रमाणात नुकसान होऊ शकेल. वास्तुत महत्त्वाची स्थित्यंतरे घडू शकतात.


सिंह

राहू, गुरु, राहुचा योग भाग्योदयकारक आहे. जीवनाला चांगले वळण देणारी ही ग्रहस्थिती  आहे. जे काम हाती घ्याल ते यशस्वी करून दाखवाल. रवी, शुक्राचा योग झालेले सर्व नुकसान भरून निघण्यास सुरुवात करील. मंगळ बलवान व उत्साही असल्याने महत्त्वाच्या कामात यश मिळेल.


कन्या

लागोपाठ आलेले दोन शापीत योग, आर्थिक बाबतीत अस्थैर्य निर्माण करण्याची शक्मयता आहे. काही नवे प्रकल्प कार्यान्वित करण्याचे बेत बदलावे लागतील. नवनव्या कल्पना अंमलात आणल्याने तुमच्या कामाचे कौतुक होईल. मानसिक ताण तणाव हळूहळू कमी होईल. जागा अथवा घर वगैरे घेणार असाल तर काळजी घ्यावी.


तुळ

गुरु, हर्षलच्य़ा प्रतियोगामुळे काही नव्या सुधारणा करण्याचा विचार कराल. जीवनाला शुभ कलाटणी मिळू शकते. मंगळ, शनि योगात काही संमिश्र अनिष्ट घटना घडू शकतात. महत्त्वाचे निर्णय चुकू शकतात. सावधगिरीने वागणे हितावह ठरेल. आपले वाहन, पॅनकार्डे, अथवा महत्त्वाच्या वस्तू शक्मयतो कुणाला देऊ नका. नको त्या प्रकरणात अडकाल.


वृश्चिक

रवी,बुध, गुरुचे भ्रमण नोकरी व्यवसाय व संततीच्या दृष्टीने शुभ आहे. त्यांच्या बाबतीत काही अपेक्षा पूर्ण करू  शकाल. मंगळ स्वगृहीचा असल्याने स्थगित  झालेले काही आर्थिक व्यवहार पुन्हा मार्गस्थ होतील. धनलाभाच्या दृष्टीने ग्रहमान चांगले आहे. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. काही नव्या पाहुण्यांचे आगमन होईल. त्यामुळे रोजच्या कामकाजाचे वेळापत्रक बदलावे लागेल.


धनु

गुरु, राहू यांचा योग, दैवी कृपा दैवी दृष्टांत, भाग्योदय, संततीसौख्य व कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने चांगला आहे. महाशिवरात्रीला कुलदेवतेच्या आराधनेमुळे काही शुभ गोष्टी या सप्ताहात घडू शकतात. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाच्या वाटाघाटी दुकान व घरादारांचे व्यवहार मार्गस्थ होतील. नोकरी व्यवसायातील काही अडचणी कमी होतील. अडगळीतील वस्तुंना चांगला भाव येईल.


मकर

लाभातील बलवान मंगळाच्या प्रभावाने प्रवास, देणीघेणी, नवे स्नेहसंबंध या बाबतीत चांगले योग असून त्यात वाढ होईल. धनलाभाच्या दृष्टीने चंद्र, शुक्राचा योग मोठे लाभ घडविण्याची शक्मयता आहे. इतरांच्या चुकांमुळे वाहन, अपघात व वाताच्या विकारापासून काळजी घ्यावी. या सप्ताहात कुणाला शब्द देऊ नका. त्याचा गैरवापर होऊ शकेल.


कुंभ

दशमातील मंगळाचे साहचर्य  चांगले आहे. त्यामुळे घरगुती व व्यावसायिक बाबतीत उत्साही वातावरण राहील. शनि, मंगळाच्या प्रभावामुळे प्रवासात त्रास  व अडचणी जाणवतील. साध्यासुध्या गोष्टीसाठी दुप्पट खर्च करावा लागेल. पण त्याचा पुढे फायदा होईल. काही नवे व्यवहार हाती लागण्याची शक्मयता आहे.


मीन

कोणत्याही बाबतीत निर्णय घेताना गोंधळ होईल. एकाच कामासाठी दोन दोन वेळा झगडावे लागेल. महत्त्वाचे निर्णय घेताना चार चौघांच्या सल्ल्यानेच घ्या. तुमच्या स्वभावाचा काही लोक गैरफायदा घेण्याची शक्मयता आहे. अतिशय जपून वागावे लागेल. पूर्वजीवनातील काही गोष्टी बाहेर पडू शकतात. पण त्यामुळे तुमचे कष्ट लोकांना दिसून येतील.

Related posts: