|Thursday, September 19, 2019
You are here: Home » उद्योग » बँक ऑफ महाराष्ट्रच्या कार्यान्वयन नफ्यात 17.39 टक्क्यांनी वाढ

बँक ऑफ महाराष्ट्रच्या कार्यान्वयन नफ्यात 17.39 टक्क्यांनी वाढ 

प्रतिनिधी/ पुणे

बँक ऑफ महाराष्ट्र एकत्रीकरणाच्या टप्प्यात असून, 31 डिसेंबर 2017 रोजी संपलेल्या नऊमाहीमध्ये डिसेंबर 2016 रोजी संपलेल्या नऊमाहीच्या तुलनेत बँकेच्या कार्यान्वयन नफ्यात 17.39 टक्क्मयांची वाढ झालेली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर. पी. मराठे यांनी मंगळवारी ही माहिती दिली.

31 डिसेंबर 2017 रोजी संपलेल्या तिमाहीचे आर्थिक परिणाम मराठे यांनी  बँकेचे कार्यकारी संचालक आर के गुप्ता आणि कार्यकारी संचालक ए. सी. राऊत  यांच्या उपस्थितीत जाहीर केले. ते म्हणाले, सामूहिक आणि एकत्रित प्रयत्नांमुळे 31 डिसेंबर 2016 च्या तुलनेत 31 डिसेंबर 2017 ला संपलेल्या नऊमाहीमध्ये थकित कर्जाच्या रोख वसुलीमध्ये 177.78 टक्के वाढ झाली आहे. भारत सरकार आणि क्मयूआयपीच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात भांडवलामध्ये सहकार्य मिळाल्याने आमच्याकडे पुरेसे भांडवल आहे. ज्यायोगे लघुउद्योग, कृषी आणि किरकोळ कर्जे यासारख्या व्यवसायवाढीच्या केंद्रावर बँक लक्ष केंद्रित करू शकेल. 31 डिसेंबर 2017 ला संपलेल्या नऊमाहीतील कार्यान्वयन नफा गतवषीच्या याच नऊमाहीच्या तुलनेत 17.39 टक्क्मयांनी वाढून 1,644.67 कोटी रुपये इतका झाला. गतवषी डिसेंबर 2016 च्या याच तिमाहीमध्ये झालेला कार्यान्वयन नफा रु. 514.97 कोटी होता. या तुलनेत 31 डिसेंबर 2017 च्या तिमाहीमध्ये कार्यान्वयन नफा रु. 419.36 कोटी इतका झाला आहे. बँकेच्या कार्यान्वयीन खर्चामध्ये घट होवून तो 7.78 टक्के इतका झाला आहे. बँकेच्या एकूण ठेवींमध्ये कासा ठेवींचे प्रमाण 45 टक्के असल्याने व्याजावरील खर्च कमी होण्यास हे प्रमाण सुदृढ आहे. बँकेचा एकूण व्यवसाय रु. 228762.33 कोटी झाला असून, डिसेंबरअखेर एकूण ठेवी 133593.16 कोटी आणि एकूण कर्जे रु. 95169.17 कोटी झाली आहेत.