|Monday, February 17, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » 50 लाख केंद्रीय कर्मचाऱयांना खूषखबर?

50 लाख केंद्रीय कर्मचाऱयांना खूषखबर? 

नवी दिल्ली /वृत्तसंस्था

50 लाख केंद्रीय कर्मचाऱयांसाठी एप्रिल महिना आनंददायी ठरणार आहे. एप्रिलमध्ये केंद्र सरकारकडून त्यांना खूषखबर मिळणार आहे. कनिष्ठस्तरीय कर्मचाऱयांच्या वेतनावाढीचा सरकारने विचार चालविला आहे. यानुसार 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारसीपेक्षा अधिक लाभ केंद्रीय कर्मचाऱयांना मिळू शकतो. केंद्रीय कर्मचाऱयांना सध्या फिटमेंट सूत्रांतर्गत 6 व्या वेतन आयोगानुसार मूलभूत वेतन मिळते. सरकारने फिटमेंट फॅक्टरमध्ये सुधारणा केल्याने या कर्मचाऱयांना वाढीव वेतन मिळणार आहे. परंतु वाढीव वेतन पुढील आर्थिक वर्षापासून मिळू लागेल. पुढील वर्षाच्या प्रारंभी याविषयीचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडला जाऊ शकतो.

7 व्या वेतन आयोगच्या शिफारसीनुसार 1 जानेवारी 2016 पासून केंद्रीय कर्मचाऱयाचे किमान मूलभूत वेतन 7 हजार रुपयांपासून 18000 रुपये प्रतिमहिन्यापर्यंत पोहोचले आहे. तर केंद्रीय कर्मचाऱयांनी हा आकडा 26 हजार रुपये करण्याची मागणी केली आहे.

Related posts: