|Saturday, October 19, 2019
You are here: Home » Top News » आयसीयू रुममधून उडी मारून रुग्णाची आत्महत्या

आयसीयू रुममधून उडी मारून रुग्णाची आत्महत्या 

ऑनलाईन टीम / नाशिक

नाशिक विभागाच्या मुख्य शासकीय रुग्णालय संलग्न असलेल्या संदर्भ सेवा रुग्णलयात तिसऱया मजल्याच्या अतिदक्षता रुमच्या खिडकीतून उडी घेत एका रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

मृत व्यक्तीचे नाव किसन पटोले असून, तो देवळाली कॅम्प परिसरातील रहिवाशी आहे. पटोले यांची बायपास सर्जरी झाली होती. त्याचा त्रास होत असल्याने त्यांना संदर्भ सेवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज दुपारी त्यांनी आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली असावी, असा अंदाज असावा.