|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » क्रिडा » शतकांच्या बादशहाचे आणखी एक शतक

शतकांच्या बादशहाचे आणखी एक शतक 

ऑनलाईन टीम / केपटाऊन

कर्णधार विराट कोहली याने दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही शतक झळकावत शतकांचा बादशहा हे आपले बिरूद पुन्हा सार्थ ठरवले आहे.

विराटच्या शतकाच्या बळावर भारताने पहिल्या सामन्यात अफ्रिकेचा पराभव केला होता. तर दुसऱया सामन्यात त्याने नाबाद 46 धावांची खेळी केली होती. तिसऱया सामन्यातही त्याने कामगिरीतील सातत्य कायम राखले. एक बाजू लावत त्याने दमदार 34 वे शतक फटकावले. रोहित शर्मा शून्यावर बाद झाल्यानंतर शिखर धवनने त्याला चांगली साथ दिली. मात्र, शिखर 76 धावांवर बाद झाला. त्यानंतर अजिंक्य रहाणे, हार्दिक पांडय़ा, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव हे स्वस्तात बाद झाले.