|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » उत्तर कोरियावर सर्वात कठोर निर्बंध लादणार : अमेरिका

उत्तर कोरियावर सर्वात कठोर निर्बंध लादणार : अमेरिका 

वृत्तसंस्था/ टोकियो

उत्तर कोरियासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने अत्यंत कठोर पाऊल उचलणार असल्याचे विधान केले. उत्तर कोरियाच्या विरोधात लवकरच आतापर्यंतचे सर्वात कठोर आणि अत्यंत आक्रमक निर्बंधांची घोषणा केली जाईल, अशी अमेरिकेचे उपाध्यक्ष माइक पेन्स यांनी बुधवारी जाहीर केले. टोकियोमध्ये जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांची भेट घेतल्यावर पेन्स यांनी ही माहिती दिली.

अमेरिका जपानसोबत मिळून उत्तर कोरियावर दडपण टाकण्याचे काम करत राहिल, असे पेन्स यांनी हिवाळी क्रीडा स्पर्धेच्या अनावरण समारंभात भाग घेण्याअगोदर म्हटले. पेन्स यांच्या 3 दिवसीय जपान दौऱयाचा उद्देश कोरियन उपखंडातील सहकाऱयांसोबतचे संबंध दृढ करणे आणि प्योंगयांगवरील आंतररष्ट्रीय दबाव कायम ठेवणे असल्याचा दावा अधिकाऱयांनी केला.

उत्तर कोरिया आणि अमेरिकेच्या दरम्यान मागील अनेक महिन्यांपासून परस्परांच्या विरोधात विधाने होत आहेत. उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उनने अमेरिकेला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देखील दिली. याच्या प्रत्युत्तरादाखल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्याकडील आण्विक कळ किमपेक्षा मोठी असल्याचे म्हटले होते.

Related posts: