|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पंतप्रधानांच्या पत्नी जशोदाबेन अपघातातून बचावल्या

पंतप्रधानांच्या पत्नी जशोदाबेन अपघातातून बचावल्या 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, जयपूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन प्रवास करत असलेल्या कारला ट्रक्टर ट्रॉलीची धडक बसून झालेल्या अपघातातून वाचल्या आहेत. त्या किरकोळ जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तथापि त्यांच्याबरोबर प्रवास करणारे त्यांचे नातेवाईक वसंतभाई मोदी ठार झाले आहेत. जयपूरजवळ चितोडगढ येथे ही दुर्घटना घडली. राजस्थानमधील कोटा येथून विवाह समारंभातून त्या पुन्हा गुजरातमधील उँझा या त्यांच्या गावी परतत होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जशोदाबेन त्यांच्या नातेवाईकांसह कोटा येथून गुजरातकडे येत होत्या. कोटा-चितोडगढ महामार्गावर त्यांच्या कारची धडक एका ट्रक्टर ट्रॉलीला बसली. या कारमधून सातजण प्रवास करत होते. अपघातानंतर कारचे मोठे नुकसान झाले. तर जशोदाबेन जखमी झाल्या. तसेच चालक जयेंद्र हाही जखमी झाला आहे. जखमींना तत्काळ चितोडगढ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तेथे जशोदाबेन यांच्या प्रकृती तपासणी केल्यानंतर त्यांची प्रकृती ठिक असून त्या किरकोळ जखमी असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी ट्रक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.