|Saturday, December 7, 2019
You are here: Home » Top News » राहुल गांधी आता माझे बॉस : सोनिया गांधी

राहुल गांधी आता माझे बॉस : सोनिया गांधी 

ऑनलाई टीम / नवी दिल्ली  :

‘पक्षाला नवीन अध्यक्ष मिळाले आहेत. सर्वांच्या वतीने मी राहुल यांना शुभेच्छा देत आहे. ते आता माझेही बॉस आहेत यात शंका नाही’, असे काँग्रेसचे माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सांगितले.

दोन महिन्यांपूर्वीच राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालय परिसरात झालेल्या एका सोहळय़ात सोनिया गांधी यांनी राहुल यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपवली होती. राहुल यांच्याकडे पक्षाची सूत्रे सोपवल्यानंतर आज झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत सोनिया यांनी राहुलना शुभेच्छा दिल्या आहेत. ’काँग्रेसला नवीन अध्यक्ष मिळाले असून सर्वांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देते. आता ते माझेही बॉस आहेत,’ असे त्या म्हणाल्या.

 

 

 

Related posts: