|Sunday, March 29, 2020
You are here: Home » Top News » ‘रामायण’ मालिकेच्या खूप वर्षांनंतर असे हस्य ऐकले ; मोदी

‘रामायण’ मालिकेच्या खूप वर्षांनंतर असे हस्य ऐकले ; मोदी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

रामायणानंतर खूप वर्षांनी असे हस्य ऐकले, अशी टिका पंतप्रधान नरेंद मोदीं यांनी खासदार रेणुका चौधरी यांच्यावर केली. राज्यसभेत आधारकार्डचे श्रेय लालकृष्ण अडवाणींना दिल्यानंतर हसू फुटलेल्या चौधरींवर मोदींनी निशाना साधला.

चौधरी यांच्या हास्यावर राज्यसभेचे सभापती व्यंकया नायडू यांनीही नाराजी व्यक्त केली. त्यावेळी मोदींनी नायडू यांना मध्येच थांबवले. ‘चौधरींना काहीही बोलू नका, अशी माझी विनंती आहे.’ ‘रामायण’ मालिकेनंतर बऱयाच वर्षांनी असे हास्य ऐकण्याचे भाग्य लाभले, असा टोला मोदी यांनी या वेळी लगावला.

या टीकेवर बोलताना चौधरी म्हणाल्या, पंतप्रधानांनी वैयक्तीक टीका केली आहे. मला यावर प्रतिक्रिया देऊन खालच्या स्तराला जायचे नाही. हे सरकार बेटी बचाओ आणि महिलांच्या सन्मानाच्या गोष्टी करतात, सन्मान राखण्याचा हा त्यांचा मार्ग आहे का ? हे अत्यंत लज्जास्पद आहे. कोणत्याही महिलेबद्दल असे वक्तव्य करणे निंदनीय आहे.

 

Related posts: