|Sunday, December 15, 2019
You are here: Home » उद्योग » सप्ताहाच्या घसरणीनंतर बाजारात तेजीचे आगमन

सप्ताहाच्या घसरणीनंतर बाजारात तेजीचे आगमन 

मुंबई / वृत्तसंस्था :

गेल्या काही सत्रात सतत होणाऱया घसरणीला अखेर ब्रेक लागला. गुरुवारी बाजार दिवसातील उच्चांकावर पोहोचल्यानंतर दबाव दिसून आला, मात्र अखेरीस तेजीने बंद झाला. दिवसातील व्यवहारादरम्यान निफ्टी 10,637 आणि सेन्सेक्स 34,634 पर्यंत पोहोचला होता. गॅलक्सी सर्फेक्टेट्स लिमिटेडचा समभाग एनएसईमध्ये 3 टक्के आणि बीएसईमध्ये 2.70 टक्क्यांच्या प्रिमियमने सूचीबद्ध झाला.

बीएसईचा सेन्सेक्स 330 अंशाने मजबूत होत 34,412 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 100 अंशाच्या मजबूतीने 10,557 वर स्थिरावला.  बँक निफ्टी 1 टक्क्यांनी मजबूत होत 25,921 वर बंद झाला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागातही चांगली तेजी परतली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 1.8 टक्क्यांनी मजबूत होत 16,649 वर बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 1.8 टक्क्यांनी वधारत 19,827 वर बंद झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 2.25 टक्क्यांनी मजबूत होत 18,131 वर स्थिरावला.

वाहन, औषध, पीएसयू बँक, आयटी, धातू, रियल्टी, भांडवली वस्तू आणि ग्राहकोपयोगी वस्तू समभागात जोरदार खरेदी झाली. मात्र एफएमसीजी, तेल आणि वायू, ऊर्जा समभागात काही प्रमाणात दबाव आला होता. निफ्टीचा वाहन निर्देशांक 1.15 टक्के, आयटी 1.11 टक्के, मीडिया 2.01 टक्के, धातू 1.46 टक्के, औषध 3.66 टक्के, पीएसयू बँक 2.64 टक्के, रियल्टी निर्देशांक 2.57 टक्क्यांनी वधारले.

दिग्गज समभागांची कामगिरी

सिप्ला, सन फार्मा, अंबुजा सिमेंट, डॉ. रेड्डीज लॅब, इंडियाबुल्स हाऊसिंग, एसबीआय, इन्फोसिस, ऍक्सिस बँक 7.6-1.75 टक्क्यांनी वधारले. आयओसी, अरबिंदो फार्मा, पॉवरग्रिड, एनटीपीसी, टाटा मोटर्स, ओएनजीसी, अदानी पोर्ट्स, आयटीसी 4.7-0.4 टक्क्यांनी उतरले.

मिडकॅप समभागात भारत फोर्ज, सन टीव्ही, जीई टी ऍण्ड टी, पेज इन्डस्ट्रीज, रिलायन्स कॅपिटल 7.7-6.6 टक्क्यांनी वधारले. युनायटेड ब्रुअरीज, बेयरक्रॉप, ब्लूडार्ट, भारत इलेक्ट्रॉनिक्स, ग्लॅक्सो कंझ्युमर 3.2-0.6 टक्क्यांनी घसरले.

स्मॉलकॅप समभागात एक्सेल इन्डस्ट्रीज, आर्शिया, ल्यूमॅक्स इन्डस्ट्रीज, मोलपीन लॅब, सूर्या रोशनी 20-15.75 टक्क्यांनी वधारले. सतलज टेक्स्टाईल्स, टीसीपीएल पॅकेजिंग, हेक्सावेयर, वक्रांगी, डायनॅमिक टेक 8.7-5 टक्क्यांनी घसरले.

 

 

 

Related posts: