|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » उद्योग » 2018 वर्ष आयटी क्षेत्रासाठी सकारात्मक

2018 वर्ष आयटी क्षेत्रासाठी सकारात्मक 

हैदराबाद / वृत्तसंस्था :

अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा होत असल्याने 2018 हे वर्ष देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी सकारात्मक असल्याचे दिसत आहे, असे उद्योग क्षेत्राची संघटना नेस्कॉमने म्हटले. गेल्या वर्षानंतर आयटी क्षेत्रात काही प्रमाणात सुधारणा दिसत आहे, मात्र ती क्रांतिकारी असल्याचे म्हणणे कठीण आहे, असे संघटनेचे आर. चंद्रशेखरन यांनी म्हटले.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी जानेवारी महिना उत्तम होता. काही कंपन्यांना मोठी कंत्राटे मिळाली आहेत. सध्या अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेतून चांगले संकेत मिळत आहेत, मात्र हे मोठय़ा प्रमाणात यशस्वी ठरतील याबाबत शंका आहे. सध्या या क्षेत्रासाठी असणारी आव्हाने संपूर्णपणे संपल्याचे सांगणे कठीण आहेत. अमेरिकन अर्थव्यवस्थेतून सकारात्मक संकेत मिळाल्याने सर्वसाधारण देशातील आयटी क्षेत्रासाठीही उत्तम असल्याचे समजले जाते. अमेरिकेकडून एच 1बी व्हिसा नियमांमध्ये कोणतेही मोठय़ा प्रमाणात फेरबदल करण्यात येणार नाहीत असे सांगण्यात आले आहे असे त्यांनी म्हटले.

 

Related posts: