|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » उद्योग » मोबाईल जाहिरात 1.2 अब्ज डॉलर्सवर पोहोचणार

मोबाईल जाहिरात 1.2 अब्ज डॉलर्सवर पोहोचणार 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

2020 पर्यंत देशातील मोबाईलवरील जाहिरात क्षेत्रातील उलाढाल 1.2 अब्ज डॉलर्सवर पोहोचेल असे अहवालात म्हणण्यात आले. देशात टीव्हीवरील पेक्षक आता मोबाईलवर जास्त वेळ घालवित असल्याने या क्षेत्रातून मिळणाऱया उत्पन्नात वाढ होत आहे, असे सिंगापूरमधील इनमोबी या मोबाईल जाहिरात क्षेत्रातील कंपनीने अहवालात म्हटले.

इंटरनेट वापरकर्त्यांची डेस्कटॉपवरून मोबाईलवर वाढत होत आहे. इंटरनेट ट्रफिकच्या बाबतीत मोबाईलचा हिस्सा 80 टक्के आहे. एक वापरकर्ता दिवसातील किमान 4.5 तास स्मार्टफोनवर इंटरनेटची सेवा वापरतो. टीव्हीवरील कार्यक्रम पाहण्यासाठीच्या वेळपेक्षा ही 37 टक्के जास्त आहे. मोबाईलवर खर्च करण्यात आलेल्या एकूण वेळेपैकी 88 टक्के वेळ ऍपसाठी जातो आणि तिसरा क्रमांक लागतो. 2017 मध्ये ऍप डाऊनलोड करण्याच्या बाबतीत भारताचा अमेरिकेनंतर क्रमांक लागतो. ऍप डाऊनलोडमध्ये भारताचा हिस्सा 12 टक्के आहे.

ऑफर्स आणि डिस्काऊंट देण्यात येत असल्याने भारतीयांकडून ट्रव्हल आणि रिटेल ऍप सर्वाधिक डाऊनलोड करण्यात येतात. याव्यतिरिक्त पहिल्यांदा ऍप वापरण्यासाठी आकर्षण वाढत आहे. मोबाईलवर व्हिडिओचा वापरही वेगाने वाढत आहे. 2021 पर्यंत भारतातील मोबाईल डेटा टॅफिकमधील व्हिडिओचा हिस्सा 75 टक्के असेल असे म्हणण्यात आले.

मोबाईलवरील जाहिरातीच्या माध्यमासाठी भारत ही जगातील 6 वी बाजारपेठ आहे. स्वस्त स्मार्टफोन, कमी किमतीत डेटा उपलब्ध होत असलव्याने व्हिडिओ पाहण्यामध्ये 124 टक्क्यांनी वाढ होत आहे. भारतीयांकडून रिटेल, करमणूक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्हिडिओ सर्वाधिक पाहण्यात येतात असे नमूद करण्यात आले. देशात केवळ 39 टक्के व्हिडिओ वायफायच्या माध्यमातून पाहण्यात येतात.

 

 

Related posts: