|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » मेजर आदित्यच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

मेजर आदित्यच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव 

नवी दिल्ली  / वृत्तसंस्था :

काश्मीरच्या शोपियां गोळीबार प्रकरणात एफआआर नोंद झाल्यावर मेजर आदित्यच्या वडिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. माझ्या मुलाविरोधात नेंदविण्यात आलेला एफआयआर रद्द करण्यात यावा अशी मागणी मेजरच्या वडिलांनी केली आहे. याप्रकरणी शुक्रवारी न्यायालयात सुनावणी होणार आहे. सैन्यान देखील या अगोदर मेजर आदित्य आणि त्यांचे सहकारी निर्दोष असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

10 गढवाल रायफल्सचे मेजर आणि माझ्या मुलाचे नाव सूडाच्या भावनेपोटी एफआयआरमध्ये जोडले गेले, सैन्याचा एक ताफा शोपियांमध्ये कर्तव्य बजावण्यासाठी निघाला होता, हा ताफा दगडफेक करणाऱयांच्या उग्र जमावात सापडला. दगडफेकीत सैन्याच्या वाहनांना देखील नुकसान पोहोचल्याचे लेफ्टनंट कर्नल करमवीर सिंग यांनी याचिकेत नमूद केले.

मेजर आदित्य सैन्यातील सहकाऱयांसोबत तणावग्रस्त भागासाठी रवाना झाले होते. यादरम्यान केवळ सैनिकांना मार्ग मोकळा करून देण्यासाठी गोळीबार करण्यात आला. दगडफेक करणाऱयांना अनेकदा दूर हटण्याचे आवाहन करण्यात आले, परंतु त्यांनी आवाहनाला दाद दिली नाही. यानंतरच तेथून हटण्याचा आणि मार्ग मोकळा करण्यासाठी उपद्रवींना इशारा देण्यात आला.

जमावाला पांगविण्यासाठी गोळीबार

याचिकेनुसार बेकायदेशीररित्या दाखल झालेला जमाव खूपच उग्र झाला होता. जमावाने एका जेसीओला मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा जमावाला इशारा देत पांगविण्यासाठी गोळीबार करण्यात आला. याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाला मागील वर्षी जमावाकडून झालेल्या पोलीस अधिकारी अयूब पंडित यांच्या हत्येचा दाखला देण्यात आला. सद्यकाळात काश्मीरमध्ये कर्तव्य बजावणे सर्वात कठिण असल्याने जम्मू-काश्मीर पोलिसांकडून दाखल एफआयआर रद्द करण्याचा आदेश दिला जावा अशी मागणी याचिकेत करण्यात आली.

Related posts: