शेअर बाजार पुन्हा गडगडला

ऑनलाईन प्रतिनिधी / मुंबई
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घसरणीमुळे भारतीय शेअर बाजारही गडगडला असून, सेन्सेक्स 505 तर निफ्टी 100 पेक्षा अधिकने घसरला. गेल्या काही दिवसातील आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मंदीचा परिणाम भारतीय बाजारवरही झाला असून, यामुळे कोटय़वधींचे नुकसान झाले आहे.