|Thursday, November 21, 2019
You are here: Home » Top News » हिंमत असेल, तर तो प्रकल्प रद्द करून दाखवा : नारायण राणे

हिंमत असेल, तर तो प्रकल्प रद्द करून दाखवा : नारायण राणे 

ऑनलाईन टीम / रत्नागिरी

हिंमत असेल, तर उद्धव ठाकरेंनी कोकणातील रिफायनरी प्रकल्प रद्द करून दाखवावा, असे आव्हान माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज येथे शिवसेनेला दिले.

रत्नागिरीमध्ये रिफायनरी प्रकल्पाविरोधात सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना ते म्हणाले, रत्नागिरी प्रकल्पाला माझा विरोध आहे. त्या जमिनीवर शिवसेनेला व्यवहार करायचे आहेत. मात्र, आपण हे होऊ देणार नाही. हिंमत असेल, तर हा प्रकल्प करून दाखवाच.

मी या मुद्दय़ाकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन बघत आहे. इथल्या जमिनीवर आलेल्या संकटाला आपण सर्वांनी मिळून सामोरे जावूयात. मी यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. कोणाच्या दबावाखाली येथील महसूल अधिकारी व पोलीस अधिकारी लोकांना त्रास देत असतील, तर ते मी सहन करुन घेणार नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लोकांना उल्लू बनवतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

या सभेदरम्यान नारायण राणेंसह माजी खासदार नीलेश राणे व नितेश राणे या दोघांनीही आपल्या भाषणातून शिवसेनेवर टीका केली.

Related posts: