|Thursday, December 12, 2019
You are here: Home » उद्योग » अर्थसंकल्पातील आयात शुल्क वाढीने 7 हजार कोटी

अर्थसंकल्पातील आयात शुल्क वाढीने 7 हजार कोटी 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्रीय अर्थसंकल्पात 45 वस्तूंवरील आयात शुल्कात वाढ करण्याची तरतूद आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी तिजोरीत 7 हजार कोटी रुपयांचे उत्पन्न अधिक मिळणार आहे. देशातील लघुद्योग क्षेत्राला याचा लाभ होणार आहे, असे अर्थ सचिव हसमुख अढिया यांनी सांगितले.

सरकारने महसुलात वाढ होण्यासाठी हा निर्णय घेतला नाही. शुल्कात वाढ करण्यात आलेल्या वस्तुंची आयात कमी प्रमाणात करण्यात येते. देशातील उत्पादन वाढीसाठी चालना देण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला. देशातील ईलेक्ट्रॉनिक वस्तुंचे उत्पादन वाढीसाठी सरकार प्रयत्न करत आहे. यानुसार अंतिम उत्पादनावर आता करात वाढ करण्यात आली आहे. यानंतर दुसऱया टप्प्यातील सुटे माल आणि त्यानंतर तिसऱया टप्प्यातील सुटय़ा उत्पादनांवर आयात आकारण्यात येणार आहे असे त्यांनी म्हटले. एलईडी टीव्ही, फळांचा ज्युस, पतंग, मेणबत्ती यासारख्या वस्तूंवरील आयात शुल्कात वाढ करण्यात आल्याने कोणताही परिणाम होणार नाही. समाजातील परवडणाऱया लोकांकडून या वस्तू खरेदी करण्यात येतात. आतापर्यंत या वस्तूंवर मोठय़ा प्रमाणात कर आकारण्यात न आल्याने त्यांचे संरक्षण होत आहे आणि करवाढ झाल्याने कोणताही परिणाम होणार नाही असे सीबीईसीचे प्रमुख वंजना सरना यांनी म्हटले.

Related posts: