|Thursday, December 12, 2019
You are here: Home » उद्योग » 1.86 लाख परवडणाऱया घरांना मंजुरी

1.86 लाख परवडणाऱया घरांना मंजुरी 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

गृह आणि नागरी विकास मंत्रालयाने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरातील गरिबांना परवडणाऱया किमतीत 1,86,777 घरे उभारण्यास मंजुरी दिली आहे. या घरांसाठी सरकारकडून 2,797 कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे. या घर उभारणीसाठी 11,169 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरातील लाभार्थ्यांसाठी 1,08,195 नवीन घरे बांधण्यात येणार आहेत. यामध्ये तामिळनाडूमध्ये 26,672 घरे, कर्नाटकमध्ये 16630, हरियाणा 13663, बिहार 11411, केरळमध्ये 9461, गुजरातमध्ये 8768, महाराष्ट्रात 7088, उत्तराखंडमध्ये 5698, ओडिशामध्ये 5133 घरांच्या उभारणीचा प्रस्ताव आहे. या श्रेणीमधील योजनेनुसार लाभ घेणाऱया योग्य व्यक्तींसाठी त्यांच्या जमिनीवर घर बांधण्यास मदत करण्यात येणार आहे.

हरियाणासाठी 799 कोटी, तामिळनाडुसाठी 609 कोटी, कर्नाटकसाठी 490 कोटी, गुजरातसाठी 182 कोटी, महाराष्ट्रसाठी 234 कोटी, केरळसाठी 142 कोटी आणि उत्तराखंडसाठी 77 कोटी रुपयांची मदत केंद्र सरकारकडून देण्यात येईल.

सरकारकडून भागीदारीने घर बांधण्यासाठीच्या योजनेमध्ये हरियाणामध्ये 36056, कर्नाटकात 16026, तामिळनाडूमध्ये 13951, महाराष्ट्रात 5035 आणि उत्तराखंडमध्ये 528 घरे बांधण्यात येणार आहेत. या प्रस्तावित घरांसाठी मंजरी देण्यात आल्याने ही संख्या वाढत 37,83,392 वर पोहोचणार आहे.

Related posts: