|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जिह्यात महिलाची सुरक्षा धोक्यात!

जिह्यात महिलाची सुरक्षा धोक्यात! 

आठवडय़ाला एक बलात्कार, 2 विनयभंग

प्रवीण जाधव /रत्नागिरी

महिलांची सुरक्षिततेबाबत सर्वच स्तरातून चिंता व्यक्त होत असताना रत्नागिरी सारख्या शांतताप्रिय जिह्यातील चित्रही आशादायी काही. जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार 2017 मध्ये दर आठवडय़ाला एक बलात्कार तर तीन दिवसांनी विनयभंगाची घटना घडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आह़े

महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी पोलीस विभागाकडून विविध कार्यक्रम राबविले जातात. मात्र या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाह़ी 2016 व 2017 मध्ये जिह्यामध्ये प्रत्येकी 47 बलात्काराच्या घटना समोर आल्या होत्या. 2016 मध्ये विनयभंगाचे 86 गुन्हे दाखल झाले होते, 2017 मध्ये त्यात वाढ होवून गुन्हय़ांची संख्या 105 वर पोहचली आहे. त्यामुळे जिह्यात महिला खरोखरच सुरक्षित आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आह़े

डिसेंबर 2012 मध्ये दिल्लीमधील निर्भया प्रकरणानंतर बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र शासनाकडून कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आल़ी त्यानंतर अशा घटनेतील आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा देखील सुनावली. मात्र कडक शिक्ष्sानंतरही अशा प्रकारच्या घटनांमध्ये घट होण्याऐवजी त्यात वाढच होताना दिसत आहे. पुरूषी मानसिकता यामागचे प्रमुख कारण असून बलात्काराच्या बहुतांश घटना या नात्यातील व ओळखीच्या व्यक्तींकडूनच होत असल्याचेही समोर आले आहे.

लैगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये यापुर्वी उत्तरप्रदेश, दिल्ली, हरियाणा या राज्यांची खूपच बदनामी झाली होती. मात्र आता महाराष्ट्रासारख्या प्रगत व पुरोगामी राज्यातही महिलांवरील अत्याचारांमध्ये सातत्याने वाढच होताना दिसत आहे. सांस्कृतीक, शैक्षणिक, आरोग्य आदी विविध क्षेत्रांमध्ये वेगळा ठसा उमटवणारा रत्नागिरी जिल्हाही याला अपवाद ठरलेला नाही. दर तीन दिवसांन घडणाऱया लैगिक अत्याचाराबाबतच्या घटनांमुळे जिह्यात महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आह़े त्यामुळे स्त्रियांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी आपल्याला तयार करणे ही आता काळाची गरज निर्माण झाली आह़े

महिला असुरक्षीत!

प्रकार 2016 2017

बलात्कार 47 47

विनयभंग 86 105

Related posts: