|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » मनोरंजन » व्हॅलेंटाईन व्हाया व्हॉट्सऍप लग्न

व्हॅलेंटाईन व्हाया व्हॉट्सऍप लग्न 

कॉफी आणि बरंच काही, मि ऍण्ड मिसेस सदाचारी या चित्रपटातील प्रार्थना बेहरे आणि वैभव तत्ववादी ही जोडी रसिकांची फेव्हरेट ठरली होती. दोघांची ऑनक्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावल्याने ही जोडी पुन्हा कधी एकत्र येते याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. ‘व्हॉट्सऍप लग्न’ या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने प्रार्थना-वैभव पुन्हा एकदा एकत्र दिसणार असल्याने ही जोडीच यंदाचं व्हॅलेंटाईन कपल आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

व्हॅलेंटाईन डे म्हटला की दिवसभर आपल्या प्रिय व्यक्तिसोबत धमाल करायची. सकाळी उठल्यापासूनचा प्रत्येक क्षण तिच्यासोबत घालवायचा. यात भेटवस्तू देणं, कॉफी शॉपमध्ये जाऊन गप्पा मारणं, निसर्गरम्य स्थळी जाऊन आपल्या जीवनातील रोमॅण्टीक क्षण कैद करण्यासोबतच आपल्या प्रिय व्यक्तीला जे आवडतं ते करण्यातच स्वत:चा आनंद मानणं हेसुद्धा आलंच. वैभव-प्रार्थना हे यंदाचं व्हॅलेंटाईन कपल व्हॉट्सऍप लग्न या चित्रपटात अशाचप्रकारचे रोमॅण्टीक क्षण साजरे करताना दिसणार आहेत. फिनक्राफ्ट मीडिया ऍण्ड एन्टरटेन्मेंट प्रा. लि या बॅनरखाली तयार झालेल्या व्हॉट्सऍप लग्न या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन विश्वास जोशी यांनी केले आहे. जाई जोशी आणि व्हिडीओ पॅलेस हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. हा चित्रपट 16 मार्चला प्रदर्शित होणार आहे.

Related posts: