|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » मराठी बाणेचा नऊवारीत स्काय डायव्हिंग

मराठी बाणेचा नऊवारीत स्काय डायव्हिंग 

ऑनलाईन टीम / थायलँड

 

थायलंडमध्ये नऊवारी साडी नेसून तेरा हजार फूट उंचीवरून स्काय डायव्हिंग जम्प करत पद्मश्री शीतल महाजन यांनी एक आगळावेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

 

मराठी बाणा कायम रहावा व मराठी संस्कृतीचे जतन रहावे, यासाठी त्यांनी हे धाडस केल्याचे स्पष्ट केले आहे. जगामध्ये आतापर्यंत नऊवारी साडी नेसून स्काय डायव्हिंग करण्याचा धाडशी प्रयत्न कोणीही केला नसल्याचा दावा शीतल महाजन यांनी केला आहे. स्काय डायव्हिंग साहसी खेळात 6 जागतिक व 17 राष्ट्रीय विक्रम शीतल यांनी नोंदविले आहेत. त्यांच्या या पराक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.