|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कुसूंबी ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

कुसूंबी ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन 

प्रतिनिधी /सातारा :

कुसुंबी ग्रामपंचायतीने दि. 29 जानेवारीला ग्रामसभा बोलवली होती. त्यामध्ये एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत झालेली कामांचा विषय घेण्यात आला होता. ठराव क्र. 92 व विषय क्रमांक 18 व 12 नुसार संयुक्त वनव्यवस्थापन समितीकडून केलेली विकास कामांची सक्षम अधिकाऱयांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे कुसुंबी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱयांकडे केली आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी सुनील बावकर यांना निवेदन देताना कुसुंबी येथील शंकर वेंदे, मनिषा चिकणे, संजय गाडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, गेल्या पाच वर्षात एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत कुसुंबीमध्ये कृषी सहाय्यक व पर्यवेक्षक यांच्यामार्फत सुमारे 80 लाखाचे कामे झाली आहेत. तसेच संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडून 4 लाख 50 हजार रुपयांची कामे झाली आहेत. या कामांची ग्रामस्थांनी पाहणी व चौकशी केली असता काही अंशी 20 टक्के कामे प्रत्यक्षात झाली असून केवळ 80 टक्के कामे ही कागदोपत्री करण्यात आली आहेत. प्रजासत्ताकदिनावेळची ग्रामसभा दि. 29 रोजी घेण्यात आली. त्यामध्ये या विषयावर चर्चा करताना काही ग्रामस्थांनी यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे सभेच्या निदर्शनास आणून दिले. ग्रामस्थांनीच या कामाची चौकशी सक्षम अधिकाऱयांमार्फत करावी, असा ठराव ग्रामसभेत मांडला, त्यानुसार कार्यवाही व्हावी, अशी मागणी केली आहे.

Related posts: